Maharashtra Live News Updates: मराठवाड्यातील नागरिकांसाठी मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांकडून ४५ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा

Maharashtra breaking News Updates: मराठवाड्यासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून तीन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
breaking Marathi news Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting Live Updates maharashtra Politics Latest Marathi Updates
breaking Marathi news Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting Live Updates maharashtra Politics Latest Marathi UpdatesSaam TV

मराठवाड्यातील नागरिकांसाठी खुशखबर ; मुख्यमंत्र्यांकडून ४५ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या विकासकामांच्या घोषणा केल्या.

धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला, संभाजीनगरमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर

मराठा आरक्षणा पाठोपाठ आता धनगर आरक्षणचा प्रश्न देखील पेटला आहे. मराठवाड्याच्या संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतांना संभाजीनगर शहरात धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, ही प्रमुख मागणी घेऊन धनगर बांधव आक्रमक झाले आहे.

शहरातील क्रांती चौक ते मंत्रिमंडळाची बैठक सुरू असणाऱ्या भटकल गेट परिसराकडे धनगर समाजाच्या मोर्चाने एकेकुच केलीय. तर धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी नाही लावला, तर राज्यात मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला फिरू देणार नाहीत. असा संत इशारा यावेळी आंदोलन धनगर बांधवांनी दिला आहे.

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, ही मागणी घेऊन छत्रपती संभाजी नगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.. संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असून मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा. ही मागणी घेऊन क्रांती चौक ते भटकल गेट पर्यंत वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे..दरम्यान या मोर्चाला काही वेळात सुरुवात होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्रीपवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.

अडीज वर्षामध्ये मराठवाड्यासाठी तुम्ही काय केलं? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा अडीज वर्ष मराठवाड्यासाठी काय केलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. फडणवीसांनी संभाजीनगर येथे पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली.

Maharashtra Live News Updates: मराठवाड्यासाठी आज मोठ्या घोषणा होणार?

मराठवाड्यासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून तीन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे.

त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पाडला जाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com