पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या ’झाडु’ने दिग्गज नेत्यांना घरी पाठवले आहे. यात विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री ओ.पी. सैनी, पंजाब कॉंग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचा समावेश आहे. (Analysis Punjab Assembly Election Results)
कॅप्टन अमरिंदर सिंग: पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा (पूर्व) मतदारसंघात पराजय झाला. त्यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित सिंग कोहली यांनी पराभूत केले.
चरणजित सिंग चन्नी: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यंदा दोन मतदारसंघातून मैदानात उतरले होते. भदौर आणि चमकौर साहिब या मतदारसंघात त्यांनी राजकीय भवितव्य पणाला लावले होते. परंतु मतदारांनी त्यांना दोन्ही ठिकाणी घरी बसवले. चमकौर साहिब येथे आपचे उमेदवार चरणजित यांनी पराभूत केले तर भदौर येथून लब सिंग उगोके यांनी चन्नी यांना हरविले.
विशेष म्हणजे भदौरमध्ये चन्नी यांना पराभवाचे पाणी पाजणारे लब सिंग हे एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात काम करतात.
नवज्योत सिंग सिद्धू: क्रिकेटचे मैदान गाजवणारे आणि शेरोशायरीतून वाहवा मिळवणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी विधानसभेच्या आखाड्यात सपाटून मार खाल्ला. अमृतसर (पूर्व) मतदारसंघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्यौत कोर यांनी पराभूत केले.
ओ.पी. सैनी: कॉंग्रेसचे उमेदवार आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री ओ.पी. सैनी यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार अजय गुप्ता यांनी अमृतसर (मध्य) मतदारसंघातून पराभूत केले.
सुखबीर सिंग बादल: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल देखील पराभूत झाले. ते जलालाबाद येथून निवडणूक लढवत होते. आम आदमी पक्षाचे जगदीप कम्बोज यांनी बादल यांना पराभूत केले.
प्रकाश सिंग बादल: शिरोमणी अकाली दलाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांची विजयाची परंपरा खंडित झाली. त्यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमित सिंग खुदियान यांनी पराभूत केले.
विक्रमसिंग मजिठिया: शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि नवज्योत सिंग सिद्धूचे कट्टर विरोधक विक्रम सिंग मजिठिया यांचा अमृतसर (पूर्व) मधून पराभव झाला.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.