मुंबई महानगरपालिकेचा प्रभागवाढीबाबतचा नवीन आराखडा मंगळवारी जाहीर करण्यात आला. या मध्ये नऊ प्रभाग वाढविण्यात आले असून असून हे नवीन प्रभाग भायखळा, वरळी, परळ, दहिसर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर या परिसरातील आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal Elections) या प्रभागात कोणाचं वर्चस्व राहील आणि कोणाचं नुकसान होईल त्या संदर्भातील हे सविस्तर वृत्त (Analysis of BMC Ward restructuring for elections)
मुंबईमधील (Mumbai) २२७ प्रभागांच्या संख्येत २०११ ची जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा अंदाज समोर ठेऊन ९ ने प्रभाग वाढ होऊन प्रभागांची संख्या आता २३६ इतकी झाली आहे . मुंबई महापालिकेने (BMC) वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता, त्याला मंजुरी देखील मिळालीय. यानंतर १४ फेब्रुवारी पर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर वॉर्ड पुर्नरचना अंतीम केली जाईल.
Mumbai Elections: प्रभागवाढीचा नवा प्रारूप आराखडा..कोणाला होणार फायदा ?नव्या प्रारूप प्रभाग वाढीनुसार मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर याठिकाणी प्रत्येकी ३ वॉर्ड वाढवले जाणार आहेत . ९ प्रभागापैकी प्रत्येकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढणार आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये वाढणार आहेत, तर पश्चिम उपनगरात कांदिवली, अंधेरी, दहिसरमध्ये, तर पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, घाटकोपर मध्ये प्रभाग वाढणार आहेत.
राज्यात सत्तेत असलेलं तत्कालीन सरकार प्रभाग आराखडा तयार करताना आपल्या सोयीनुसार रचना करत असल्याचं म्हटलं जातं. २०१७ साली देखील तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मुंबईतील प्रभाग रचनेत आपल्या सोयीनुसार बदल करण्यात आल्याचा आरोप झाला होता , यावेळी देखील भाजपकडून तसा आरोप केला जातोय. त्यामुळे या प्रभाग रचनेचा नव्या प्रारूप आराखड्या संदर्भात भाजपकडून हरकती आणि सूचना येतात का ते पाहणं महत्वाचं असेल.
प्रभाग रचनेत शिवसेनेला झुकतं माप ? भाजपलाही संधी
- प्रभाग रचनेच्या नव्या प्रारूप आराखड्यानुसार वाढवण्यात आलेल्या प्रभागात शिवसेनेचे (Shivsena) ६ तर भाजपचे (BJP) तीन आमदार असलेल्या विभागात हे प्रभाग वाढलले आहेत .
- यामध्ये ६ शिवसेनेचे आमदार असलेले प्रभाग हे वरळी, परळ, भायखळा, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, या भागात शिवसेनेचे आमदार आहेत, तसेच खासदारही. त्यामुळे या भागात शिवसेनेचं वर्चस्व राहणार आहे.
- तर घाटकोपर, दहिसर, कांदिवलीत प्रभाग वाढलेल्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत , त्यामुळे भाजपचे वर्चस्व या ठिकाणी राहील असं म्हटलं जातंय.
- पण २०१७ च्या पालिका निवडणुकांचा निकाल या भागातील पाहिला तर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला कांदिवली आणि दहिसरमध्ये यश मिळालं होतं. पण घाटकोपर मध्ये भाजपला पूर्ण संधी आहे.
वाढलेल्या प्रभागातील पक्षीय बलाबल
शहर भागात -३
१.वरळी (आमदार आदित्य ठाकरे - शिवसेना)
२. भायखळा (आमदार यामिनी जाधव - शिवसेना)
३. परळ (आमदार अजय चौधरी - शिवसेना)
पश्चिम उपनगर -३
१.दहिसर (आमदार मनिषा चौधरी - भाजप)
२. अंधेरी (आमदार रमेश लटके - शिवसेना)
३. कांदीवली (आमदार अतुल भातखळकर,भाजप)
पूर्व उपनगर ३
१. कुर्ला (आमदार मंगेश कुडाळकर - शिवसेना)
२. चेंबुर (आमदार प्रकाश फातरपेकर - शिवसेना)
३. घाटकोपर (आमदार राम कदम - भाजप)
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.