Abdul Hamid Birthday: रणांगणात पाकिस्तानचे 8 पॅट्टन टॅंक उद्ध्वस्त करणारा 'परमवीर' योद्धा

हे युद्ध भारताने जिंकले आणि इतिहासाच्या पानात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला
Abdul Hamid Birthday
Abdul Hamid Birthdaysaam tv
Published On

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये (Kashmir)1947 -49 दरम्यान पाकिस्तानशी (Pakistan) झालेल्या युद्धात अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या युद्धात पाकिस्तानच्या तुलनेत भारताची लष्करी (Soldier) क्षमता खूपच कमकुवत असल्याची पाकिस्तानची धारणा झाली होती. या गैरसमजामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा 1965 मध्ये युद्ध (1965 India-pakistan War) छेडले. हे युद्ध भारताने जिंकले आणि इतिहासाच्या पानात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मात्र या युद्धात भारताने आपले अनेक शूर सैनिक गमावले. हे युद्ध 'परमवीर' च्या (Paramvir chakra) शौर्यासाठीही इतिहासाच्या पानांतही नोंदले गेले. एका योध्याने जीपवर बसून पाकिस्तानचे एक-दोन नव्हे तर आठ पॅट्टन टॅंक उद्ध्वस्त केले होते. हा योद्धा म्हणजे शत्रूवर तुटून पडणारे अब्दुल हमीद. (Abdul Hamid: One of Indian Army’s most revered soldiers)

Abdul Hamid Birthday
आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक..

अब्दुल हमीद यांचा आज जन्मदिवस. 1965 च्या युद्ध आणि अब्दुल हमीद यांचा पराक्रम विसरता येण्यासारखा नाही. त्यांच्या या पराक्रमाच्या कहाण्या आजही देशात सांगितल्या जातात. याचे कारण म्हणजे त्यावेळी पॅट्टन टॅंक हे अजिंक्य मानले जात होते. मात्र हमीद यांनी युद्धाच्या मैदानात पाकिस्तानच्या पॅट्टन टॅंकची जणू कबरच तयार केली होती. याच युद्धात अब्दुल हमीद 10 सप्टेंबर 1965 रोजी रणांगणावर हुतात्मा झाले. परंतु या युद्धातून त्यांनी आपल्या अतुलनीय शौर्याचे अविस्मरणीय किस्से लिहिले होते.

- 1 जुलै 1933 रोजी उत्तर प्रदेशात अब्दुल हमीद यांचा जन्म

1 जुलै 1933 रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपुर धरमपूर गावात अब्दुल हमीद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोहम्मद उस्मान शिवणकाम करायचे. पण हमीद यांचे मन या कामात लागत नव्हते. त्यांना लाठी काठी खेळणे, कुस्तीचा सराव करणे, नदी पार करणे, गोफणाने निशाणा लावणे, यासारख्या गोष्टींमध्ये रस होता. यासह ते लोकांच्या मदतीसाठी मोठ्या उत्साहाने पुढे येत असत. एकदा त्यांनी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन मुलींचे प्राणही वाचवले होते.

- वयाच्या 20 वर्षी सैन्यात भरती झाले

वयाच्या 20 व्या वर्षी अब्दुल हमीद वाराणसीत भारतीय सैन्यात भरती झाले. प्रशिक्षण घेतल्यानंतर 1955 मध्ये त्यांना 4 ग्रेनेडीयर्समध्ये पोस्टिंग मिळाली. 1965 मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान युद्धाची सुरवात झाले होती. तेव्हा ते सुट्टीवर आपल्या घरी गेले होते. पण पाकिस्तानबरोबर वाढत्या तणावाच्या दरम्यान त्यांची सुट्टी रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना परतण्याचा आदेश मिळाला. सैन्यात परण्यासाठी जेव्हा अब्दुल हमीद तयार करत होते तेव्हा त्याच्या पत्नी रसूलन बीबीने त्यांना जण्यापासून रोखले होते. परंतु हमीद यांच्यासाठी देशसेवा आणि त्यांचे कर्तव्य सर्वांपेक्षा महत्त्वाचे होते.

Abdul Hamid Birthday
Abdul Hamid Birthday Saam tv

- 'अजिंक्य पॅट्टन टॅंकचा उडवला धुव्वा

सैन्यात परतातच अब्दुल हमीद यांना पंजाबच्या तरन तारण जिल्ह्यातील खेमकरण सेक्टरमध्ये पोस्टिंग देण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने अमेरिकन पॅट्टन टॅंकच्या माध्यमातून खेमकरण सेक्टरच्या असल उताड गावावर हल्लाबोल केला. त्यावेळी या टाक्या अजिंक्य मानल्या जात असत. या युद्धातील अहवालानुसार, 8 सप्टेंबर 1965 रोजी सकाळी 9 वाजता अब्दुल हमीद आपल्या जीपमधून चिमा गावबाहेरील ऊसाची शेतातून जात होती. ते चालकाशेजारी बसले होते. त्यांना दुरूनच टॅंकचा आवाज ऐकू आला आणि काहीमिनिटातच त्यांना ते टॅंक दिसू लागले. त्यांनी आपल्या रिकॉयलेस गणमधून शत्रूचे टॅंक आपल्या नजरेच्या पट्ट्यात येताच हल्ला केला.

Abdul Hamid Birthday
Abdul Hamid Birthday saam tv

- एका झटक्यात शत्रूचे 4 टॅंक नेस्तनाबूत

अब्दुल हमीदच्या शौर्याबदल त्यांचे साथीदार म्हणतात की, त्यांनी एकाच वेळी शत्रूचे 4 टॅंक उडवले होते. ही बातमी जेव्हा मुख्यालयात पोहचली तेव्हा या कामगिरीसाठी सैन्याकडून त्यांना परमवीर चक्र देण्यासाठी शिफारस पाठविली गेली. यानंतर 10 सप्टेंबर रोजी त्यांनी शत्रूचे आणखी 3 टॅंक नष्ट केल्याची माहिती काही अधिका्यांकडून कळाली. त्यानंतर त्यांनी आणखी एका टॅंकवर निशाणा साधला त्यावेळी शत्रूच्या एका सैनिकाने त्यांना पहिले. यावेळी दोन्ही बाजूंनी हल्ला झाला. हमीद यांनी पाकिस्तानचा आणखी एक टॅंक उद्ध्वस्त केला. परंतु शत्रूने अब्दुल हमीद यांच्या जीपवर निशाण साधत त्याच्या जीपवर हल्ला केला. या हल्ल्यात अब्दुल हमीद हुतात्मा झाले. देशाच्या रक्षणासाठी आणि या शौर्यासाथी हमीद यांना 'परमवीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com