शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देणारं एक फळपिक

या फळाची शेती शेतकऱ्यांना कशी दिलासा देतेय ते सांगणारी हे स्पेशल यशोगाथा
शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देणारं एक फळपिक
शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देणारं एक फळपिक Saam Tv
Published On

औरंगाबाद - दुष्काळी मराठवाड्याला दिलासा देणाऱ्या पिकाच्या शेतीचा शोध सुरु झाला आहे. काही शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देणारं एक फळपिक सापडलं आहे. होय हे फळ आहे ड्रॅगनफ्रुटचं. या फळाची शेती शेतकऱ्यांना कशी दिलासा देतेय ते सांगणारी हे स्पेशल यशोगाथा...

पैठण तालुक्यातील वडवाळी येथील राम आणि श्याम, हे दोघे जुळे भाऊ. दोघेही उच्चशिक्षित.एम.ए.बीड.एड पर्यंत शिक्षण घेतलेले.खाजगी संस्थाचालकाकडे लाखो रुपये मोजून नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित शेतीत प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. गावात शेतीत रमून जाणं या दोघाना आवडतं. त्यातूनच परंपरागत शेतीला आधुनिक दिशा देऊन त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली.

हे देखील पहा -

कधी दुष्काळ तर कधी गारपीट अशा संकटांना मराठवाड्यातला शेतकरी घेरला आहे. त्यातून वेगळा मार्ग काढीत या दोघांनी ड्रॅगन फ्रुटची शेती सुरू केली. दोन वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांच्या शेतातला ड्रॅगन फ्रुट परदेशवारीला निघाला आहे. ड्रॅगन बरोबरच या तरुण राम शाम कडील अंबा,सिताफळ,मोसंबीच्या बागा पाहण्यासारख्या आहेत. फळबागेला दुग्ध व्यवसायाची जोड देवून नवनवीन प्रजातींच्या गाई त्यांच्या गायगोठ्यात पाहायला मिळतात.

 मराठवाड्यात गेल्या दहा वर्षापासून पर्जन्यमानात मोठी घट झालीय.जमिनीतील पाणी पातळी घटल्याने १०० फूट विहीर खोदूनही पाणी मिळत नाही.किती बोअर घेतले तरी पाणी लागत नाही.त्यामुळे त्यांनी कमी पाण्यात येणारी ड्रॅगन फ्रुटची शेती पैठण तालुक्यातील वडवाळी शिवारात सुरू केली. विशेष म्हणजे ड्रॅगन शेतीला खर्च कमी आहे.एकदा लागवड केल्यानंतर काही वर्षे नफा मिळत राहतो.सध्या भारतातल्या सगळ्याच मोठ्या शहरात ड्रॅगनला मोठी मागणी आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देणारं एक फळपिक
रस्त्यावरील खड्डया विरोधात शिवसेना आक्रमक; धुळे मनपासमोर ठिय्या

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन  फ्रुट शेतीचा मोठा फायदा होऊ शकतो हे आता हळूहळू लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे या जुळ्या भावांनी ड्रॅगन  फ्रुट शेती करण्यासाठी तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत. सोबतच जर प्रक्रिया उद्योग सुरू झाला तर ड्रॅगन शेतीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो यादृष्टीने त्यांचं काम सुरू आहे.त्यासाठी आता जिल्हा दूध संघाची मदत घेतली जाणार आहे.फलोत्पादन मंत्री याच तालुक्यातील आहेत.त्यांनी लक्ष घालून पैठण तालुक्यात काही प्रक्रिया उद्योग पुढील काळात बिडकीन डी.एम.आय.डी.सीत आणले तर मराठवाड्यातील आधुनिक शेती करण्याऱ्या युवकांना नक्की प्रोत्साहन मिळेल.

मराठवाड्यात दुष्काळप्रवण पिकांची शेती करणं आता काळाची गरज बनलीय. अन्यथा तापमानवाढ, अतिपाऊसाच्या या काळात निसर्गाशी अनुरुप होणाऱ्या पिकांची शेती वाढणं गरजेचं आहे. या फळपिकांच्या लागवड आणि विक्रीसाठी तसंच प्रक्रिया व्यवसायासाठी सरकारनं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com