भंडारा शहरात रानटी डुक्करांचा हैदोस...

pig
pig
Published On

भंडारा  -  बातमी आहे भंडाऱ्यातील एका शुरवीर मुलाची.आपन बाहुबली सिनेमात भल्लाल देवाला एका विशालकाय रेड्या सह प्रतिकार करतांना पाहिलं मात्र भंडारात ही एक भल्लाल देव असून त्याने चक्क 3 व्यक्तींना जखमी केलेल्या रान डुक्कराशी तब्बल दीड तास झुंज देत त्याला पकडून त्याच्यावर वन विभागाची टीम येई प्रयत्न बसून राहिला होता. त्या 22 वर्षीय शुर वीर मुलाचे नाव आहे भावेश किशन नेवारे. wild pigs in bhandara city

भंडारा शहरातील शितला माता मंदीर परिसरात आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक भला मोठा रानडुक्कर अंदाजे 5 ते 6 फुट लांब असलेल्या डुक्कराने या परिसरात राहणाऱ्यां  नागरिकांवर हल्ला चढविला. यात प्रथम रजनी भरतसिंग भदोरीया (वय 55) यांना मांडीला चावा घेतला तर रुपेश किशन नेवारे (वय 22 ) याच्या पायाला चावा घेत जखमी केले, नंतरभावेश वर त्या रानडुक्कराने हल्ला करत त्याची 2 बोटे फैक्चर केले.

मात्र यावेळेस रानडुक्कराने चुकीचा माणसाला जखमी केले. संतापलेल्या भावेशने चक्क त्या रानडुक्कराने पकडण्याचा चंग बांधला व त्याला तब्बल दीड तास झुंज देत त्याला पकडून त्याच्यावर बसून राहिला. लोकांनी वनविभागाला फोन केले. वन विभाग येई प्रयत्न तो तसाच त्याला पकडून त्या रानडुक्कराला पकडून होता. wild pigs in bhandara city

अखेर वन विभागाचे कर्मचारी तिथे दाखल होत त्या रानडुक्कराला पिंजरा बंद केले. यात भावेश किशन नेवारे याच्या शौर्याची मात्र चर्चा होऊ लागली आहे. जखमींना उपचारा करिता सामान्य रुग्णालयात भर्ती केले असून या सर्व जखमींना शासनाच्या वतीने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com