वसिम जाफरची सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

Wasim jaffer retired
Wasim jaffer retired
Published On

मुंबई - प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दादा म्हणून ओळखला जाणारा फलंदाज वसीम जाफरनं शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून रिटायरमेंट जाहीर केलीये. "देशाचं प्रतिनिधीत्व करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. याचा मला सार्थ अभिमान असल्याचं वसीम जाफर म्हणालाय. 

वसीम जाफरने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. “सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि धोनी यांसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. तर स्थानिक क्रिकेटमध्ये दादा संघ असलेल्या मुंबईच्या खेळाडूंचे त्याने आभार मानलेत. 

रणजी सामन्यांमध्ये धावांचा विक्रम


प्रथम श्रेणीचे तब्बल २६० सामने खेळत जाफरनं १९ हजार ४१० धावा केल्या आहेत. यामध्ये ५७ शतकं आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे १५० रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावे १२ हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा भारतातील विक्रम आहे. 

१० फायनल, १० रणजी किताब


वसीम जाफर १९९६-९७ ते २०१२-१३ दरम्यान ८ रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर २०१८ आणि २०१९ मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानं गेल्या ११ सामन्यांमध्ये ४ शतकं झळकावली होती. तर ६९.१३ च्या सरासरीनं १ हजार ३७ धावा केल्या होत्या.

प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक


जाफरनं प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात प्रवेश मिळवला होता. तो फेब्रुवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. कसोटी सामन्यांमध्ये पहिलं शतक ठोकण्यासाठी त्याला सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर कसोटी सामन्यात त्यानं दुहेरी शतकही झळकावलं होतं.

Web Title ranji and first class cricket player wasim jaffer retires from all formats of cricket

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com