तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून केला होता खून

Saam Banner Template
Saam Banner Template

सांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी येडुपल पाटील राहणार मंगसुळी याचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. या रहस्यमय खुनाचा उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला आहे. जेसीबीवरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातूनच हा खुन झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तर मृतदेह दोन दिवस घरी ठेवून मग विल्हेवाट लावण्यात आली होती. (Unraveling of mysterious murder in Tasgaon; The murder was committed in an immoral relationship)

भिलवडी ते तासगाव रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहरीत 10 जुन रोजी एकाचा डोक्यात धारधार शस्त्राने वार करून मृतदेह प्लॉस्टिकच्या कागदात गुंडाळून टाकल्याचे समोर आले. त्यानंतर तासगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यासह एलसीबीच्या पथकास सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने वेगवेगळी पथके तयार करून संशयितांचा शोध घेण्यात येत होता.

हे देखील पाहा

सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापुर, कर्नाटक, चडचण, अथणी या ठिकाणी मृताची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर तांत्रिक माहिती आधारे मिळालेल्या माहितीनुसार तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चौकशी केली असता तो मालक मंगसुळी (कर्नाटक) येथील असल्याचे समोर आले. मंगसुळी येथे पथकाने चौकशी केली असता जेसीबी मालकाचे नाव हरी पाटील असल्याची ओळख पटली. तो गायब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवली. 

तर जेसीबीवरील ऑपरेटर सुनील राठोड हाही पसार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेवून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता मृत हरी पाटील हा पत्नीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुनील याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर दोघांच्यात वादही झाला होता. सुनील याने जेसीबीवरील काम सोडले होते. त्यानंतर ८ जून रोजी मृत हरी हा सुनील याला बोलविण्यासाठी गेला. त्यानंतर पुर्वीच्या वादातून राठोड पती पत्नींनी हरी पाटील याचा डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. त्यानंतर संशयित दोघांनी त्याचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. त्यानंतर भिलवडी ते तासगाव रस्त्यावरील एका विहिरीत तो मृतदेह टाकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी काळ्या प्लॉस्टिकच्या कागदात मृतदेह गुंडाळला. त्यानंतर गोनपाटाच्या किलतानास दोरी बांधून मृतदेह टाकून देण्यात आला होता.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com