रायगडमध्ये कोरोना काळात उतमात ; गोदामाबाहेरील हजारो टन धान्याची नासाडी

raigad news
raigad news
Published On


रायगड : संपूर्ण जगावर कोरोनाचे Corona संकट ओढवले आहे, राज्य व देशातही कोरोनाने कहर माजविला आहे. कुणी विषाणूंच्या संसर्गाने मरत आहे, तर कुणी पोटाला अन्न मिळत नाही म्हणून भूक बळीने मरत आहे, अशातच रायगड Raigad जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील बोरी फाटा या ठिकाणी शासकीय धान्याच्या गोदामाबाहेरील धान्याची पोती अस्ताव्यस्त पडली असल्याचे वास्तव समोर आले आहे. Thousands of tons of grain wasted outside the warehouse

या पोत्याना उंदीर, फोडले असून धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. प्रशासन मात्र डोळे मिटून बसलेले आहे.  या परिस्थितीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक एक दाणा निर्माण करण्यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनी आपला घाम गाळून पिकवलेले धान्य या शासकीय गोदामाबाहेर गेली ४ महिन्यांपासून पडून असून या धान्याकडे गोदामाचा एकही अधिकारी फिरकला नाही. या धान्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे या ठिकाणी तलाठी कार्यालय आणि मंडल अधिकारी यांचे देखील कार्यालय शेजारी असून त्यांनी डोळे मिटून घेतल्याची भूमिका दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. Thousands of tons of grain wasted outside the warehouse

सदरील परिस्थितीचा व्हिडियो प्रवीण म्हात्रे या जागरूक तरुणाने काढून प्रशासन शेतकऱ्यांशी कशा प्रकारे बेईमान पद्धतीने वागत आहे आणि त्यांनी कष्टाने पिकविलेल्या धान्याची कशा पद्धतीने नासाडी करत आहे याचे वास्तव समोर आणले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्याच्या या बेपरवाईचे दृश्य सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जनतेतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. Thousands of tons of grain wasted outside the warehouse

Edited By : Krushna Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com