पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत

sanjay raut.jpg
sanjay raut.jpg

नाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील पाचही वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार आहेत. जेव्हा तीन पक्षांनी सरकार स्थापन केले, तेव्हा  वचनबद्ध करून निर्णय घेतला की पाचही वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदी असतील. जर कोणी याबद्दल बोलले असेल तर त्या केवळ अफवा समजाव्यात, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच, पूर्वीच्या सरकारमध्ये काही गोष्टी ठरलेल्या होत्या. मात्र इथे मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही वाटाघाटी करण्यात आली नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.  (There will be no negotiations for the Chief Minister's post for five years said Sanjay Raut ) 

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी नाशिक आणि जळगावमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे विलीनीकरण झाले नसून ही एक युती आहे. सर्व आपल्या पक्षाचा विस्तार व मजबूत करण्यास मोकळे आहेत. प्रत्येक निवडणुका एकत्रित लढवण्याची आमची बांधिलकी नाही. स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक नेते निर्णय घेतात. आम्ही फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखतो, असे संजय राऊत म्हणाले. 

- शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न 
2014 ते 2019 या काळात शिवसेना भाजपासोबत राज्यात आणि केंद्रात सत्तेत होती. मात्र सत्तेत असताना भाजपाने शिवसेनेला गुलामसारखी वागणूक दिली,  इतकेच नव्हे तर शिवसेनेला नेहमीच दुय्यम वागणूक देत संपवण्याचा प्रयत्नही केला, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, भाजपासोबत  सत्तेत नसलो तरी आमचं तरी नातं तुटलेलं नाही, असं स्वतः उद्धव ठाकरे यनीच म्हटल आहे, मग त्यात गैर काहीच नाही. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीचं समर्थनही  केलं.

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com