औरंगाबाद : आगामी काही महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal Corporation निवडणुकीसाठी शिवसेनेनी पुन्हा स्वबळाची तयारी सुरु केलीय. अलीकडेच जिल्हा परिषद, जिल्हा बँकेवर भगवा फडकवल्यानंतर पुढील सर्व निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी जोर लावण्याचं आवाहन पालकमंत्री सुभाष देसाईं यांनी शिवसैनिकांना केलं आहे. Sivsena Will Fight Aurangabad Municipal Corporation on its own
त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही नव्या वाटेचा विचार करतायत. मात्र औरंगाबाद महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
हे देखील पहा -
मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना Shivsena शाखेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या व्हर्च्युल मेळाव्याला मार्गदर्शन करतांना खुद्द शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई Shubhash Desai यांनी यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक आमदारांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यावर भगवाच फडकला असून आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना सत्ता काबीज करेल असा आशावाद देसाईंनी व्यक्त करत, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यात तीन पक्षाचे महाविकाआघाडी सरकार सत्तेवर येऊन उद्धव ठाकरे Uddhav Thackeray मुख्यमंत्री CM झाले. त्यानंतर एक धोरण म्हणून यापुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी करून एकत्रित निवडणुका लढण्याचा विचार तीनही पक्षातील नेते करत आहेत.
काही निवडणुकींमध्ये याची अंमलबजावणी देखील झाली. परंतु आता तीन्ही पक्षांनी आघाडी ऐवजी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी पुणे महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत जाहीर सांगितले होते. आता औरंगाबादमध्येही शिवसेना स्वबळावर सत्ता विश्वासाने कामाला लागण्याच्या सूचना नेते करत आहेत.
आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर काॅंग्रेसच्या Congress नेत्यांनीही स्वबळाची आमची अगोदरच तयारी असल्याचे सांगितले. आतापर्यंत औरंगाबाद महापालिकेची स्थापना झाल्यापासून भाजप BJP आणि शिवसेनेची युती होती. आता राज्यातच युती नसल्यानं औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीसोबत जाणार का, उपस्थित केला जात होता.
मात्र, आता शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केली असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला NCP स्वतंत्र मार्ग काढावा लागेल. त्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीतील वाद अधिक उफाळून येऊ शकतो, त्यामुळे स्वबळाचा नारा यशासाठी की पराभवासाठी याचा विचार निवडणुकी Election अगोदर करायला हवा.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.