डोंबिवलीत 'या' कारणावरून सेना भाजपमध्ये तापले राजकारण

kachara
kachara

डोंबिवली   -  केडीएमसीने KDMC घनकचरा Garbage व्यवस्थापन शुल्क वसूली एप्रिल महिन्यापासून सुरु केली आहे. प्रथम सहामाही रुपये 300 व द्वितीय सहामाही 300 असे एकूण 600 रुपये आता मोजावे लागणार आहेत. या शुल्क वसुलीला आता भाजपाने BJP विरोध केला असून याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा कर रद्द करावा अशी मागणी केली आहे. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. यावेळी शिवसेनेचे Shivsena खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Vijay Suryawanshi यांच्यावर टिका केली. तर या टिकेला आता खासदार शिंदे यांनी  उत्तर  दिले आहे आणि आयुक्तांची बाजू घेतली आहे.  Sena to BJP over recovery of KDMC solid waste management 

केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीवरुन सेना भाजपमध्ये आता राजकारण तापले आहे. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत हा कर रद्द करावा अशी मागणी करीत मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्रसुद्धा दिले आहे. आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत कराविषयी माहिती देताना केडीएमसीचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी व खासदार डॉ. शिंदे यांच्यावर टिका केली. केडीएमसीचे आयुक्त प्रत्येक गोष्ट खासदार शिंदे यांना विचारुन करीत असतात. कराबाबतची गोष्ट त्यांना विचारुन केली का ? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. 

हे देखील पहा -

आज खासदार डॉ. शिंदे यांनी व्हेंटिलेटर व इतर साहित्य  डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयास दिले. यावेळी पत्रकारांनी आमदारांनी टीका केल्याचा प्रश्न विचारला असता खासदारांनी सांगितले की आयुक्त हे चांगले काम करीत आहेत. शहराच्या हिताचे निर्णय घेतात त्याबाबत कुणीही राजकारण करू नये काही समस्या मागण्या असतील तर प्रत्यक्षात भेट घेऊन मांडाव्यात असे सांगितले.  पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी शासन निर्देशाप्रमाणे निर्णय घेतलाय ,बहुतांश महापालिका नगरपालिकांनी या आदेशाची अमलबजावणी केलीय त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील केल्याचे स्पष्ट केले. Sena to BJP over recovery of KDMC solid waste management 

या करावरुन सेना भाजपमध्ये राजकारण तापले असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत कचरा संकलन उपयोगकर्ता शुल्काला स्थगिती द्यावी अशा मागणीचे पत्र दिले आहे. त्यामुळे भाजपच्या या भूमिकेला मनसेचा सुद्धा पाठिंबा मिळाला आहे. आता तरी कोरोना काळात राजकारण न करता हा शुल्क माफ होईल का हे पहावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com