बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या

crime bedya news
crime bedya news
Published On

सांगली : कोरोनाची Corona गंभीर परिस्थिती सर्वत्र सध्या निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार सांगलीच्या मिरजेतील Miraj सिनर्जी हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. Sangli police have arrested a youth for reporting a fake corona without testing

हॉस्पिटल मध्ये आय टी IT विभागात सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या स्वप्निल बनसोडे कडून विना टेस्ट Test कोरोना रिपोर्ट देण्यात येत असल्याचा प्रकार सांगलीच्या Sangali स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने  उघडकीस आणला आहे. जिल्हाबंदी, राज्यबंदी असल्याने प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात जाणाऱ्या व्यक्तींसाठी, रुग्णांसाठी ई- पाससाठी E-Pass आणि कोरोना टेस्ट आवश्यक आहे.

हे देखल पहा - 

सांगलीत अनेक जणांना टेस्ट न  करताच  कोरोना रिपोर्ट देण्याचा उद्योग स्वप्नील बनसोडे कडून सुरू होता. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी Police बनावट ग्राहक पाठवून रिपोर्ट हवा असल्याची मागणी केली असता, बनसोडे याने प्रति रिपोर्ट ५०० रुपयांचा मागणी केली होती. Sangli police have arrested a youth for reporting a fake corona without testing

त्यानंतर पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने आतापर्यंत अनेक विना टेस्ट कोरोना रिपोर्ट, ई- पास, आवश्यक असणाऱ्या आणि मयत रुग्णांना कोरोना रिपोर्ट देण्यात आल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com