खामगाव परिसरात रात्री जोरदार पाऊस पडला आणि हे जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर आलेत. त्यानंतर, प्रचंड संख्येने जमिनीवर आलेले हे बेडूक जणू काही आकाशातून पडल्याचा भास खामगावकरांना झाला आणि सकाळी सकाळीच अफवेच पेव फुटलं. खामगाव परिसरात बेडकांचा पाऊस पडला. कुणी म्हणतो की यामुळे कोरोना वाढणार आहे तर कुणी म्हणतो कोरोनामुळे या बेडकांचा रंग पिवळा झालाय. मग काय, सर्वदूर अफवाच अफवा. (Rumors of frog rain in Buldhana VIDEO)
हे देखील पाहा
जाणकारांच्या मते मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या पावसात जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर येतात कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो. बेडकांचा पाऊस वैगैरे ह्यासर्व अफवा असून नागरिकांनी यावर विस्वास ठेऊन नये. बेडकांचा पाऊस वगैरे पडत नसून जमिनीखाली असलेले बेडूक पहिल्या पावसानंतर जमिनीवर येतात, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं करण्यात आल आहे.
दरम्यान, राज्यभरात जोरदार पावसाला सुरवात झालेली आहे. जोरदार पाऊस झाल्याने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचणे, वीज कोसळणे, पूल वाहून जाणे यासारख्या घटना घडत आहे. यावेळेस हवामान खात्याच्या म्हणायनुसार १०० टक्के पाऊस पडणार आहे.
Edited By : Pravin Dhamale
ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.