वाचा | राज ठाकरेंनी राज्यपालाकडें काय केली मागणी 

वाचा | राज ठाकरेंनी राज्यपालाकडें काय केली मागणी 
Published On

मुंबई: परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्स आणि महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा काही प्रोजेक्ट्स देऊन अथवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल, अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या विषयांचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेलं असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

कोरोना रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान जाणून देशाने इतका मोठा लॉकडाऊन केला, कारण लोकांचा जीव वाचला तर पुढे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे? असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती भयंकर असल्याने गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता आणखी किती काळ लॉकडाऊन राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. लॉकडाऊन शिथिल केला तरी कोरोना संपला असं होत नाही, अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

तसेच कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे किमान त्यात परीक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नको, निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे.

Read | What did Raj Thackeray demand from the Governor?

 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com