रायगडात पोलिसांकडून 13 महिन्यात 5.96 कोटींची दंडवसुली

police karvai
police karvai
Published On

रायगड: कोरोनाचा Corona प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे Restrictions उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रायगड Raigad पोलिसांनी Police लोकांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईतून १ मार्च २०२० ते २६ एप्रिल २०२१ या तेरा महिन्यांच्या कालावधीत रायगड पोलिसांनी ५ कोटी ९६ लाखांची दंडवसुली केली आहे. In Raigad police recovered 5 crore and 96 lakh forfeit in 13 months

रायगडातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर उतरुन लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत. मात्र नियमित आवाहन केल्यावरही, नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा Action बडगा उगारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या दंडात्मक कारवाईतून गेल्या १३ महिन्यात तब्बल ५ कोटी ९६ लाख १९ हजार ८४२ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

१ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत रायगड पोलिसांनी ५ कोटी ३८ लाख ६८ हजार ७४२ रुपयांची दंडाद्वारे वसुली केली आहे. यामध्ये विनामास्क मोकाट फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करत त्या द्वारे, ४ लाख ७२ हजार २४२ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १८८, २६९,२७० अन्वये ५३ अश्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी १३ केसेस न्यायालयात निकाली निघाल्या आहेत.  त्यातून १ लाख ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४० केसेस अजून न्यायालयात प्रलंबित आहेत. In Raigad police recovered 5 crore and 96 lakh forfeit in 14 months

या दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली असून  या पुढेही अशीच कारवाई सुरु ठेवणार आहेत.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com