पंतप्रधान मोदींनी केलं शास्त्रज्ञांनच कौतुक

पंतप्रधान मोदींनी केलं शास्त्रज्ञांनच कौतुक
Published On

बेंगळुरू: सध्याच्या घडीला आपले ऑर्बिटर चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची शिकस्त केली. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटतो, असंही ते म्हणाले. चांद्रयानचा प्रवास अखेरच्या टप्प्यात अपेक्षेनुसार होऊ शकला नाही, पण हा प्रवास खूपच जबरदस्त आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान देशानं अनेकदा अभिमानास्पद क्षण अनुभवले.

विक्रम लँडरचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार होतं. मात्र, अवघ्या २ किलोमीटरवर असताना लँडरशी संपर्क तुटला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या मुख्यालयातून शास्त्रज्ञांसह देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. 'मी तुमची मनस्थिती जाणून होतो. तुमच्या चेहऱ्यावरील निराशा मी पाहत होतो. त्यामुळंच अधिक वेळ तिथे थांबू शकलो नाही. अनेक रात्री तुम्ही नीट झोपला नाहीत. तरीही तुम्हाला सकाळी बोलावून तुमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा होती. या मोहिमेशी जोडलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या मनस्थितीत होता. बरेच प्रश्न होते. मोठ्या यशासह पुढे जात असतानाच, अचानक सर्व बदलून जातं. मीही प्रत्येक क्षण तुमच्यासोबत अनुभवला,' असं ते म्हणाले.

आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात आपण अनेक वेळा पराभूत झालो. पण आपण जिद्द सोडली नाही. आपला हा प्रवास आणि प्रयत्न यशस्वी झाल्याचं अभिमानानं सांगू शकतो. येणारा काळ सोनेरी असेल. परिणामांमुळं निराश न होता पुढे जाणं ही आपली परंपरा आणि संस्कार आहेत, असंही मोदी म्हणाले. या मोहिमेत अनेक अडथळे आले असले, तरी त्यानं आपला आत्मविश्वास कमकुवत झाला नाही तर तो आणखी मजबूत झाला आहे, असा धीरही त्यांनी शास्त्रज्ञांना दिला.

तुमच्या आत्मविश्वासावर माझा पूर्ण भरवसा आहे. मी तुम्हाला उपदेश देण्यासाठी आलो नाही. तुमच्याकडून प्रेरणा मिळावी, यासाठी मी सकाळी सकाळी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही प्रेरणेचा सागर आहात. अशा सामर्थ्यशाली सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो, असंही मोदी म्हणाले.

Web Title:: Prime Minister Modi praised scientists​

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com