जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण

Police also beaten in dispute between the two groups
Police also beaten in dispute between the two groups
Published On: 

वाशीम : वाशिम Washim जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाथजोगी समाज आणि मुस्लिम समाज या दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस Jaukalka Police गेले असता, तेथील जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. Police also beaten in dispute between the two groups

दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने, वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मालेगाव Malegaon तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे मुस्लिम समाजाच्या शेतातील माती नाथजोगी समाजातील लोकांनी चोरल्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. Police also beaten in dispute between the two groups

दरम्यान, या गावातील दोन्ही गटातील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आणि गावात सध्या शांतता ​असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी बोलताना सांगितले..

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com