मेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार  

मेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार  
Published On

मुंबई : मेट्रो 10, 11 आणि 12 या मार्गांसह मेट्रो भवनचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वांद्रे कुर्ला संकुलात हा सोहळा संपन्न झाला.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोज) मेट्रो 10, कल्याण ते तळोजा मेट्रो 12 महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी हे मार्ग उपयोगी ठरणार आहे.

याशिवाय वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मेट्रो मार्ग 11 वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. मेट्रोच्या तीन मार्गांसह 32 मजली मेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झाले.

मुंबई आणि महानगर प्रदेशात भविष्यात निर्माण होणाऱ्या 337 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी मेट्रो भवनची निर्मिती केली जाणार आहे.1 लाख 14 हजार 088चौ. मी इतक्‍या क्षेत्रफळावर मेट्रो भवनची इमारतीचे बांधकाम होणार आहे. यातील 24 हजार293 चौ. मी इतक्‍या जागेवर संचलन आणि नियंत्रण केंद्र आणि 9 हजार 624 चौ. मी इतकी जागा मेट्रो प्रशिक्षण केंद्रासाठी तर 80 हजार 171 चौ. मी. जागा सिम्युलेटर्स व मेट्रो संबंधित तांत्रिक कार्यालयांसाठी राखून ठेवली जाणार आहे.

मेट्रो कोचही वांद्रे कुर्ला संकुलात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.मेक इन इंडियाच्या धर्तीवर या मेट्रो डबे(कोच)ची निर्मिती करण्यात आली आहे.दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 ए आणि अंधेरी(पूर्व) ते दहिसर(पूर्व) या मेट्रो 7 मार्गासाठी 500 हून अधिक अत्याधुनिक यंत्रणा असलेले कोच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने मागविले आहेत. याशिवाय अंधेरी(पूर्व) ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 मार्गावरील प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या बाणडोंगरी या मेट्रो स्थानकाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. स्थानकावर सोलर उर्जा वापरून एल ई डी फिटिंग्ज असणार आहे. याशिवाय अंध प्रवाशांना उपयुक्त व्हावी या दृष्टीने या स्थानकावरील उद्घावाहनांवरील बटणेही ब्रेल लिपीत आहेत.

कार्यक्रमादरम्यान महामुंबई मेट्रो ब्रॅण्ड व्हिजन या पुस्तिकेचे अनावरण केले जाणार आहे. महानगर प्रदेशात सहज जोडणी उपलब्ध करणे आणि आरामदायी आणि जलद प्रवास व्यवस्था निर्माण करणे हा महामुंबई मेट्रोचे उद्दीष्टय आहे.


Web Title: Pm modi lay foundation stones 3 metro lines mumbai
 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com