कर्नाटक मधून सांगलीला येणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबला....

sangli oxygen
sangli oxygen

सांगली -  कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा Oxygen तुटवडा निर्मण झाला आहे. Oxygen supply to Sangli from Karnataka stopped 

तर दुसरीकडे  सध्या कर्नाटक Karnataka राज्यातील बेल्लारी येथून सांगली Sangli जिल्ह्यासाठी सुरू असलेला ऑक्सिजनचा oxygen पुरवठा थांबला आहे. बेल्लारी मधून 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यासाठी  सुरू होता. मात्र तो ऑक्सीजन पुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील टँकर कर्नाटक मधून रिकामा परतला आहे. अशी माहिती औषध प्रशासन अधिकारी नितीन भांडारकर Nitin Bhandarkar यांनी दिली आहे.

हे देखील पहा - 

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यात आता सांगली जिल्ह्यामध्ये  सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा सांगलीत निर्माण होत आहे. जिल्ह्याला सध्या 43 टन ऑक्सिजनची गरज आहे आणि ती गरज दिवसेंदिवस वाढत आहेत. Oxygen supply to Sangli from Karnataka stopped 

सांगली जिल्ह्याला पुणे आणि कर्नाटकच्या बेल्लारी या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा होता.मात्र आता कर्नाटक राज्यातुन सुरू असलेला ऑक्सिजनचा पुरवठा अचानक बंद झालेला आहे. कर्नाटक मधून केंद्र सरकारने सांगलीसाठी देण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवलेला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात बेल्लारी येथून मिळणारा 10 टन ऑक्सिजन बंद झाला आहे. पण इतर ठिकाणाहून तो उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू सल्याचे अन्न व औषध विभागाचे औषध सहाय्याक आयुक्त नितीन भांडारकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com