"लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन" बघा आता मोदी टीव्ही समोर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी

modi news
modi news

नवी दिल्ली: पंतप्रधान PM नरेंद्र मोदींनी Narendra Modi काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही डॉक्टरांशी Doctors संवाद साधला. यावेळी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी भावुक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला. या चित्रामुळे आम आदमी AAP पक्षाचे राज्यसभेचे खासदार MP संजय सिंह Sanjay Singh यांनी त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचे सगळ्यांना पाहायला मिळत आहे. Now Modi will come in front of TV and will start crying MPs prediction came true

आपले पंतप्रधान मोदी देशातील कोरोना Corona परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येतील आणि येऊन रडतील, असं सिंह यांनी गेल्याच महिन्यात म्हटलं होतं. आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी आपल्या ट्विटरच्या Twitter माध्यमातून  आहे.

यावर आम आदमी पक्षानं एक अधिकृत पत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय यांनी १७ एप्रिलच्या वाराणसी Varanasi च्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त करून दाखवलेले भाकित २१ मे रोजी खरे ठरले आहे. असे आपने या पत्रकात नमूद केल आहे.

हे देखील पहा -

१७ एप्रिल रोजी संजय सिंग यांनी पत्रकारांना एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी 'अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर येतील आणि येऊन रडतील. आणि देशभरातील वृत्तवाहिन्या  मध्ये एकच चर्चा असेल, पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले. आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,' असे त्यांनी म्हटले होते. Now Modi will come in front of TV and will start crying MPs prediction came true

याच मुलाखतीचा काही भाग संजय सिंह यांनी शेअर केला आहे. आणि मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. मी 'जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजीच खरे ठरले. आपल्या देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवी आहे. असे ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोत, निवडणुकीदरम्यान ज्यांनी स्वतः  प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला, आणि आता तेच टीव्ही वर येऊन रडण्याचं नाटक करत आहेत,' अशा शब्दांत संजय सिंह यांनी टोला लगावला आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com