जूनपासून SBI च्या कॅश काढण्याच्या नियमात नवे बदल 

sbi.jpg
sbi.jpg

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank Of India ने  नॉन होम ब्रांचमधून Non Home Branch  पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल केले आहेत. कोरोना Corona Virus साथीच्या पार्श्वभूमीवर  ग्राहकांना त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.  त्यामुळे आता ग्राहकांना  त्यांच्या जवळच्या शाखेतून अधिक पैसे काढता येणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेने याबाबत माहिती दिली आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आता  नॉन-होम शाखेतून पैसे काढण्यासाठी (बँकेची स्वतंत्र शाखा) मर्यादा वाढविण्यात आली आहे. मात्र हे बदल केवळ 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असतील,' असेही बँकेने सांगितले आहे.  (New changes in SBI's cash withdrawal rules from June) 

- काय आहेत नवीन नियम?
ग्राहकांना आता त्यांच्या गृहशाखेशिवाय Non Home Branch इतर शाखांकडून जास्त पैसे काढता येतील. नव्या नियमांनुसार आता बचत खात्यातील पासबुकद्वारे पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे आपण आपल्या नावावर दिवसाला 25 हजार रुपये काढू शकतात.  त्याचबरोबर ग्राहकांना  चेकद्वारे त्यांच्या नावावर दिवसाला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.  तर तृतीय पक्षाद्वारे Third Party  पैसे काढण्याची मर्यादा (केवळ चेकद्वारे) 50 हजार करण्यात आली आहे.

- जूनपासून बँक ऑफ बडोदामध्ये सकारात्मक वेतन प्रणाली लागू 

1 जूनपासून म्हणजेच आजपासून  बँक ऑफ बडोदा चेकमधून पैसे देण्याची पद्धत बदलणार आहे. बँक ग्राहक फसवणूकीला बळी पडू नयेत म्हणून सकारात्मक वेतन पुष्टीकरण  Positive Pay Confirmation अनिवार्य असेल. धनादेशाद्वारे फसवणूक रोखणे, हे  ही  प्रणाली राबविण्याचे उद्दीष्ट आहे. जेव्हा ग्राहक 2 लाख किंवा त्याहून अधिक रुपयांचा बँक चेक देतात तेव्हाच सकारात्मक वेतन प्रणालीनुसार चेकच्या तपशीलांची पुष्टी करावी लागेल.
सकारात्मक वेतन प्रणालीनुसार, धनादेश जारी करणार्‍यास त्या धनादेशाशी संबंधित माहिती भरणा बँकेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावी लागेल. एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे ही माहिती दिली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com