चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज, किशोरी पेडणेकर यांची माहिती

kishori
kishori
Published On

मुंबई - दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, चक्रीवादळात Cyclone त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 'तौत्के'असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५, १६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात Goa मुसळधार पावसाची Rain शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' Orange aleart दिला आहे.  Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar

तर दुसरीकडे मुंबईच्या Mumbai समुद्रकिनाऱ्यांवर देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू शकतो. त्यादृष्टीने पालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या चक्रीवादळामुळे २ दिवस सी लिंक Sea Link बंद राहणार आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी दिली आहे.  

हे देखील पहा -

मुंबई महानगर पालिकेने Mumbai Municipal Corporation यंत्रणा सज्ज केली आहे योग्य त्या सर्व उपाययोजना करून ठेवल्या आहेत. समुद्र किनारी वस्तीतील लोक निर्मनुष्य करण्याचं काम सुरू आहे. तसेच या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आसपासच्या परिसरातील ३८४ हून अधिक झाडांची छाटणी केली आहे . AMC सोबत मिटिंग झाल्या आहेत आपण सर्व परीने तयार आहोत असे देखील महापौर यावेळी म्हणाल्या. Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar

या चक्रीवादळाचा   तडाखा कदाचित मुंबईला बसणार नाही. शहरात ज्या ठिकाणी पाणी घुसू शकते अशा ठिकाणी पंप ठेवले आहेत. मुंबईच्या 6 चौपाट्या आहेत तिथे आपातकालीन पथके तैनात करण्यात आली आहे. सगळं तैनात असता पण हा निसर्ग आहे निसर्गाच्या ताक्तीचा अंदाज बांधता येत नाही. ते वादळ मुंबईकडे आलंच, तर सौम्य होऊन येईल. विजेच्या तारांचा प्रवाह देखील खंडित केला आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

तसेच, बीकेसी, दहिसर अशा ठिकाणी असणाऱ्या कोविड सेंटर मधील रुग्ण हलवायची का याबाबत दुपारपर्यंत निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. ICU पेशंट हलवणे रिसकी आहे त्यासाठी टीम तयार केल्या आहेत. 100 च्या परीने लाईफ गार्ड तेथे तैनात केले आहे. अशी देखील माहिती यावेळी महापौर यांनी दिली. Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar

Edited By - Shivani Tichkule


 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com