नाट्यगृहांमध्ये आता नो सिग्नल..

नाट्यगृहांमध्ये आता नो सिग्नल..

तुम्ही नाटक पाहायला जात आहात ? तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे महत्त्वाचे फोन आधीच करून घ्या. कारण तुम्ही ज्या नाट्यगृहात नाटक पाहण्यासाठी जात आहात तिथे  जॅमर बसवलेलं असेल. होय, नाट्यगृहात नाटक सुरु असताना सुरु असलेला मोबाईलचा वापर या गोष्टीला कारणीभूत आहे. 

नाटक सुरु असताना प्रेक्षकांचे फोन वाजणे किंवा मोबाईलचा वापर याने काही नाट्यकलावंत नाराज होते. अभिनेता सुबोध भावे, सुमीत राघवन, विक्रम गोखले या कलाकारांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय जॅमर बसवण्याचीही मागणी होत होती. नाटक सुरु होण्याआधी मोबाईल बंद करण्याच्या घोषणा करुनही तोच प्रकार सारखा घडू लागला. आणि हीच  अडचण लक्षात घेऊन नाट्यगृहात जॅमर बसवले जावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिका सभागृहात केली होती. ही मागणी आता महापालिकेनं मंजूर केली असून दरम्यान काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची जबाबदारी निर्माते, संस्था व आयोजकांची असेल, असंही स्पष्ट करण्यात आलयं. 

नाट्यकलावंतांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई महापालिकेकडून बसवण्यात येणाऱ्या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माते, संस्था , आयोजक, आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणीनुसार प्रशासनाच्या मंजूर अटी आणि शर्तीनुसार उपलब्ध करून देण्यात येतील. या निर्णयानंतर नाट्यगृहात नाटक सुरु असताना नाट्यकलावंतांना मोबाईलच्या आवाजाचा व्यत्यय येणार नाही शिवाय नाट्यरसिकही विनाव्यत्यय नाटक पाहू शकतील. या निर्णयामुळे यापुढे नाटक सुरु असताना मोबाईलचा वापर करणाऱ्या आणि नाटकात व्यत्यय निर्माण करणाऱ्या प्रेक्षकांवर आळा बसलाय.

WebTitle : mobile jammers will be installed in theaters of mumbai 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com