नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षांपासून जगभरात वापरला गेलेला इंटरनेट ब्राऊझर 'इंटरनेट एक्स्प्लोरर' Internet Explorer ला विराम देण्याचा निर्णय मायक्रोसाॅफ्टनं Micorsoft घेतला आहे. २०२२ मध्ये 'इंटरनेट एक्स्प्लोरर'ला निवृत्त केलं जाईल अशी घोषणा मायक्रोसाॅफ्टनं केली आहे. Microsoft to Stop Internet Explorer from 2015
गेल्या काही वर्षांत क्रोम Chrome मोझिला Mozilla, फायरफाॅक्ससारखे Firefox अन्य ब्राऊझर्स मोठ्या प्रमाणात वापरात आल्याने 'इंटरनेट एक्स्प्लोरर' चा वापर मंदावला होती. त्यामुळे आता मायक्रोसाॅफ्टही आपल्या ग्राहकांना 'मायक्रोसाॅफ्ट एज'कडे ववळण्यास प्रवृत्त करत आहे. 'इंटरनेट एक्स्प्लोरर' वर ज्या वेबसाईट आधारित आहेत, त्यांना 'मायक्रोसाॅफ्ट एज' कडून सपोर्ट मिळेल, असे मायक्रोसाॅफ्टनं जाहीर केलं आहे.
हे देखिल पहा
विंडोज १० वर 'इंटरनेट एक्स्प्लोरर' चं पुढचं रुप मायक्रोसाॅफ्ट एज असेल असं आम्ही जाहीर करत असल्याचं मायक्रोसाॅफ्ट एजचे प्राॅग्रॅम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी म्हटले आहे. इंटरनेट एक्स्प्लोरर ११ हे डेस्कटाॅप अॅप्लिकेशन बंद करुन १५ जून पासून २०२२ पासून विंडोज १०च्या काही व्हर्जनला असलेला त्याचा सपोर्ट काढून घेण्यात येईल. दीर्घकालीन सर्व्हिस चॅनेला पुढील वर्षीपर्यंत 'इंटरनेट एक्स्प्लोरर' चा सपोर्ट मिळेल. मात्र अन्य सर्व व्हर्जनमधून 'इंटरनेट एक्स्प्लोरर' चा सपोर्ट काढून घेण्यात येईल, असे लिंडरसे यांनी सांगितले.
याला पर्याय म्हणून मायक्रोसाॅफ्ट एजचा सपोर्ट ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना आयई मोडसह मायक्रोसॉफ्ट एज वापरता येईल. मायक्रोसॉफ्टने दोन वर्षांपूर्वी एजसाठी आयई मोड तयार केला आहे आणि यामुळे जुन्या वेबसाइट्ससाठी नवीन क्रोमियम-आधारित ब्राउझर स्वीकारण्याची मुभा देण्यात येणार आहे. Microsoft to Stop Internet Explorer from 2015
मायक्रोसॉफ्ट पाच वर्षांहून अधिक काळ इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करण्यापासून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मायक्रोसॉफ्ट एज प्रथम २०१५ मध्ये कार्यान्वयित करण्यात आले. तेव्हा पासूनच इंटरनेट एक्स्प्लोररच्या निवृत्तीच्या प्रवासाला प्रारंभ झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.