पाकिस्तानकडून दोन हजारांच्या बनावट नोटांची निर्मिती? भारतीय सुरक्षायंत्रणेसमोर नवं आव्हान 

पाकिस्तानकडून दोन हजारांच्या बनावट नोटांची निर्मिती? भारतीय सुरक्षायंत्रणेसमोर नवं आव्हान 
Published On

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात कट कारस्थान रचू लागलाय. एकीकडे दहशतवाद्यांमार्फत हल्ला करायचा आणि दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची असे दोन मोठे प्लॅन पाकनं आखलेत. पाकिस्तानमार्फत दोन हजारांच्या बोगस नोटांची निर्मिती केली जात असल्याची माहितीही समोर येतीय. तपासयंत्रणांच्या माहितीनुसार कराचीतल्या मलीर-हाल्टमधल्या पाकिस्तानी सिक्युरिटी प्रेसमध्ये या नोटा छापल्या जातायेत. त्यासाठी ऑप्टिकल वेरियबल इंकचा वापर केला जातोय. 

ऑप्टिकल वेरियबल शाईची खासियत म्हणजे नोटेवर ती हिरव्या रंगाची दिसते. मात्र नोटेची दिशा खाली-वर केल्यानंतर याच शाईचा रंग निळा होतो. सुत्रांच्या माहितीनुसार या शाईची निर्मिती एका विदेशी कंपनीमार्फत केली जाते. काही विशिष्ट देशांनाच या शाईचा पुरवठा केला जातो. आयएसआयच्या दबावात पाकिस्तानच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये भारताच्या बनावट नोटांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येतीय.

असंही म्हंटलं जातं की बनावट नोटा भारतात आणण्याची जबाबदारी कुख्य़ात डॉन दाऊन इब्राहिमवर सोपवण्यात आलीय. युद्धाच्या पोकळ धमक्या देणारा पाकिस्तान किती खालच्या थरावर उतरू शकतो हेच यातून अधोरिखित होतंय. 

WebTitle : marathi news pakistan to print indian two thousand rupee notes to threatened indian economy  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com