वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे. अंबाती रायुडूसह पंतला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते.
शिखरच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम होती त्यामुळे आज त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर तो संघात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नेथन कुल्टर नाईलचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्यावर आदळला होता. त्याला वेदना होत होत्या. मात्र, शिखर धवनने वेदन सहन करतच शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता.
शिखरच्याऐवजी संघात लोकेश राहुल सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता आहे तर चौथ्या क्रमांकावर आता पंत किंवा विजय शंकरला संधी दिली जाऊ शकते.
Web Title: Rishabh pant called as a replacement of Shikhar Dhawan
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.