स्पृहा जोशीला आहे या गोष्टीचा फोबिया ?

स्पृहा जोशीला आहे या गोष्टीचा फोबिया ?

मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमांमध्ये आपल्या सुंदर अभिनयामुळे आणि निवेदक म्हणूनही प्रेक्षकांचं प्रेम अभिनेत्री स्पृहा जोशीला मिळालय. आता आणखी एका वेगळ्या माध्यमात स्पृहा झळकू लागलीय. ते माध्यम म्हणजे वेबसिरीजचं माध्यम. 'द ऑफिस' या आंतरराष्ट्रीय सीरिजच्या अधिकृत रुपांतर असलेल्या वेबसिरिजमध्ये स्पृहा झळकली. आणि आता 'रंगबाज फिर से' या वेबसिरिजमध्ये स्पृहाची महत्त्वाची भूमिका आहे.

या वेबसिरिजमध्ये स्पृहा राजस्थानी महिलेची भूमिका साकारत आहे. शिवाय स्पृहाला या निमित्ताने तिचा आवडता अभिनेता जिमी शेरगीलसोबत काम करण्याची संधीही मिळालीय. जिमी शेरगलीच्या अर्थात या सिरिजमधील अमरपाल सिंहच्या पत्निची भूमिका स्पृहा साकारतेय. रुक्मिणी अमरपाल सिंह असं या भूमिकेचं नाव आहे.

'रंगबाज फिर से' या प्रोजेक्टविषयी बोलत असताना स्पृहाने तिच्या एका गोष्टीविषयी असलेल्या फोबियाविषयी सांगीतलयं. स्पृहाला गेल्या काही महिन्यांपासून एक भिती सतावतेय. ही भिती आहे ऑडिशन्सची.  ऑडिशन्सची भिती वाटू लागल्याचं स्पृहाने नुकतच सांगीतलय. चांगले कास्टिंग डिरेक्टर स्पृहाला ऑडिशन्ससाठी बोलवायचे पण स्पृहा भितीमुळे त्या ऑडिशन्सला जात नसे. स्पृहाला ऑडिशन्सचा जणू फोबिया जडला होता.

या सगळ्यातून बाहेर पडायला स्पृहाला खूप वेळ लागला. आणि रंगबाजच्या ऑडिशनसाठी जेव्हा स्पृहाला फोनआला तेव्हा स्पृहाने स्वत:ला ऑडिशनला जाण्यासाठी तयार केलं. स्पृहाच्या ऑडिशनविषयीची भिती पाहून कास्टिंग डिरेक्टर पराग मेहतानेही स्पृहाला याविषयी समजावले. मात्र 'रंगबाज फिर से'च्या ऑडिशननंतर आणि भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर स्पृहाची ही भिती आता कमी झाली आहे.

या वेबसिरीजच्या  भूमिकेसाठी स्पृहाचा वेगळा लूक पाहायला मिळतोय. शिवाय राजस्थानी भाषा, वाक्याची लय, लहेजा शिकतानाही मजा आल्याचं स्पृहा सांगते. यासाठी महादेव नावाचा डायलेक्ट टीचर पूर्णवेळ सेटवर उपस्थित असायचा. या वेबसिरीजच्या निमित्ताने स्पृहाला जुना मित्र आणि या वेबसिरिजचा दिग्दर्शक सचिन पाठकसोबत काम करण्याचाही योग आला आहे.

Web Title : Marathi actress spruha joshi Exclusive Interview By Prerana Jangam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com