आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरं आहे.. प्रत्येक भारतीयाला आता एक योद्धा बनता येणं शक्य आहे. तुमच्या हातात शत्रूच्या महत्त्वाच्या तळांची माहिती येईल. या माहितीवरून तुम्ही ते तळ उद्ध्वस्त करू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाला एक योद्धा बनण्याची संधी भारतीय सैन्यदलानं उपलब्ध करून दिलीय.
तुमच्या हातातल्या मोबाईलच्या मदतीनं तुम्हाला शत्रूराष्ट्राची दाणादाण उडवता येईल. हे शक्य होणाराय एका व्हिडीओ गेममुळे.
'इंडियन एअर फोर्स : अ कट अबाव्ह' नावाचा हा वॉरगेम भारतीय हवाईदलानं तयार केलाय. येत्या 31 जुलै रोजी हा वॉरगेम तुमच्या मोबाइलमध्ये दाखल होईल. त्याचा अधिकृत ट्रेलर हवाई दलानं नुकताच प्रसिद्ध केला.
गेल्या काही वर्षांत मोबाईलगेमचं प्रचंड वेड तरुणाईला लागलंय. 'पब्जी'सारखे गेम तर मुलांना ऍडिक्ट करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा गेम लाँच केला जातोय.
या गेमची वैशिष्ट्यंही अनोखी आहेत...
हवाईदलानं प्रसिद्ध केलेल्या ट्रेलरला सुरुवातीलाच प्रचंड लाइक्स आणि शेअर मिळालेत. मोबाइल गेमच्या भुलभलय्यात अडकलेल्या तरुणाईला देशभक्त बनवण्याची संधी या मोबाईलच्या माध्यमातून मिळणार हे मात्र नक्की.
WebTitle : marathi news indian air force to launch war game for android and ios platform
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.