#NEET परीक्षा आता वर्षातून एकदाच..

#NEET परीक्षा आता वर्षातून एकदाच..

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परिक्षा अर्थात नीट आता वर्षातून एकदाच आणि ती ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची घोषणा केली आहे.

महिन्याभरापूर्वीच मंत्रालयाने 2019 पासून NEET परिक्षा ऑनलाइन पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मोठा यू टर्न घेतला आहे.

मात्र, जेईई परिक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता NEET परिक्षा पारंपारिक पद्धतीने पेपर आणि पेनद्वारे घेण्यात येणार आहे.

NEET परिक्षा ऑनलाइन घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानुसार, हा बदल करण्यात आला आहे.

WebTitle : marathi news exams to be conducted only once in a year 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com