तब्बल 11 वर्षांची प्रतीक्षा फळाला ; काही वेळातच चंद्रावर उतरणार विक्रम

तब्बल 11 वर्षांची प्रतीक्षा फळाला ; काही वेळातच चंद्रावर उतरणार विक्रम

केवळ भारतच नव्हे तर अवघं जग भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे डोळे लावून बसलंय. भारताची चांद्रयान-२ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या हृदयाचे ठोके आता वेगानं पडू लागलेत. आजपासून सुमारे 11 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 18 सप्टेंबर 2008 रोजी चांद्रयान-२ या मोहिमेला मंजुरी दिली होती. तेव्हापासून या मोहिमेवर कार्यरत असलेल्या सर्व शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं चीज होतंय. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दस्तुऱखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः बंगळुरूतल्या इस्रोच्या केंद्रात उपस्थित राहणार आहेत.

चांद्रयान-२ मध्ये असलेल्या विक्रम लँडरच्या चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेला रात्री 1.30च्या सुमारास सुरुवात होईल. शनिवारच्या पहाटे 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. भारताची चांद्रयान-२ ही मिशन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चांद्रयान - २ ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होणारी ही पहिली अंतराळ मोहीम आहे..चंद्रावर उतरण्याची ही मोहीम पूर्णतः भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे..या मोहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करणाऱ्या विकसित देशांच्या रांगेत आता भारतही बसेल..या आधी रशिया, अमेरिका आणि  चीनची रॉकेट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलीत..त्यानंतर आता भारत चौथा देश ठरेल..

ही मोहीम का महत्त्वाची आहे, हे आता पाहूया

चंद्र हा पृथ्वीपासून सर्वांत  जवळचा उपग्रह आहे..त्यावरच स्वारी केल्यानंतर अंतराळातल्या अनेक अज्ञात गोष्टींचा थांग लावता येईल..पृथ्वीचा आतापर्यंतचा प्रवास, सूर्यमालेतील पर्यावरणाची माहिती घेण्याच्या दृष्टीनं भारत एक पाऊल पुढे जाईल..चांद्रयान-१ मोहिमेत चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे सापडले होते..ते किती आणि कुठे आहे हे या मोहिमेमुळे तपासता येईल..

GSLV MK-3 हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा लाँचर या मोहिमेचा प्रमुख भाग आहे..त्याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणारा ऑर्बिटर आहे..पृथ्वी तसंच विक्रम लँडर यांच्यातील संपर्क स्थापित करण्यात हा मोलाचा दुवा  असेल..विक्रम लँडर हा चंद्राच्या पृष्ठभागावर प्रत्यक्षात उतरेल..तर चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करण्यासाठी प्रज्ञान रोव्हर ही 6 चाकी चांद्रबग्गी असेल..

भारताची ही अत्यंत महत्त्वाची मोहीम फळाला यायला आता काही तासांचा अवधी उरलाय...मात्र, या मोहिमेचा शेवट हा भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल हे नक्की.

WebTitle : marathi news chandrayan 2 all set to land on moon 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com