मुंबई : शिवसेनेने माघार घेतली नाही, तर मग भाजपसमोर कोणताही मार्ग नाही असे सध्याचे चित्र आहे. 105 जागा जिंकूनही जी कोंडी झाली, ती भाजपसाठी अत्यंत अपमानाची बाब आहे.
शिवसेनेला हाताळण्यात आलेले अपयश हा भाजपसाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. भाजप नेते शिवसेनेसाठी आमची चर्चेची दारे 24 तास खुली असल्याचे सांगत आहे. मात्र, शिवसेना अद्याप चर्चेसाठी तयार नसल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जे ठरले आहे त्याप्रमाणे व्हावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे. संजय राऊत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल यावर ठाम आहेत.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे. तर, शिवसेना ही आगोदर ठरल्याप्रमाणे समसमान वाटप व्हावे अशी मागणी करत आहेत.
Web Title: BJP not convince Shivsena for formation government in Maharashtra
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.