मिस्टर इंडिया 'किताब पटकावलेला बॉडीबिल्डर जगदीश लाड चे कोरोनाने निधन

jagdish news
jagdish news
Published On

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकात अनेक चांगल्या लोकांचा जीव जात आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातच आता लाखो लोकांना प्रेरणा स्थान असलेला मराठमोळा बॉडी बिल्डर जगदीश लाड याचाही कोरोनाने बळी घेतला आहे. बॉडी बिल्डिंगमधील मानाचा 'किताब मानल्या जाणाऱ्या मि. इंडिया  किताबही त्याने पटकावला होता. जगदीश लाडचे वय केवळ 34 वर्ष होते. जगदीशच्या अचानक जाण्याने लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Marathi Bodybuilder Jagdish Lad passed away due to Corona

जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा शहरात उपचार सुरु होते. तिथेच त्याने आपला अखेरचा श्वास घेतला. 

जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्याने मागील वर्षीच गुजरातमध्ये बडोद्यात एक जीम सुरु केली होती. त्यामुळे तो तिकडेच राहत असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचे आकर्षण होते असे  घरातील मंडळी सांगतात. त्यामुळे पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. त्याने मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके देखील पटकावले आहेत. Marathi Bodybuilder Jagdish Lad passed away due to Corona

मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावले आहे हे जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश होत. एवढेच न्हवे मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक देखील मिळाले होते.

दरम्यान, जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com