2 मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी आरोग्यास हानिकारक 

Maggi
Maggi

सर्वांची आवडता आणि पटकन तयार होणारा पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi). या मॅगीतही अनेकांचे ब्रॅंड Brand ठरलेला असतात. अनेकजण मोठ्या आत्मविश्वासने सांगतात आम्ही नेस्लेचीच मॅगी (Nestle Maggi), किटकॅट (KitKat) खातो आणि नेसकॉफी (Nescafe) पितो. अशा श्रद्धाळू ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वची बातमी आहे. नेस्ले कंपनी (Nestle Company) तयार करत असलेली साठ टक्के उत्पादनं ही आरोग्यास अतिशय हानिकारक आहेत. (Harmful to Maggie's health in 2 minutes)

नेस्ले कंपनीचा Nestle Company एक अहवाल पुढे आला आहे. या अहवालात कंपनीने Company आपली साठ टक्के उत्पादनं (Nestle Products) नागरिकांच्या आरोग्याकरिता हानिकारक health damage असल्याचे सांगितले आहे. ही उत्पादने Products अधिक प्रमाणात खाद्यपदार्थ आणि ड्रिंक प्रोडक्ट Drink Product आहेत. दरम्यान, कंपनीच्या उत्पदनांबाबत आलेल्या अहवालानंतर कंपनीचे शेअर्स Share देखील घसरलेले पाहायला मिळत आहे.

हे देखील पहा -

फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या एका माहितीनुसार, नेस्लेच्या सीनिअर एग्जिक्यूटीव्हची एक बैठक या वर्षाच्या सुरुवातीस पार पडली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या प्रेजेंटेशनमध्ये  असे सांगण्यात आले की, कंपनीच्या फूड आणि बेवरेज प्रॉडक्टसच्या केवळ 37 % ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग प्रणालीनुसार 3.5% अधिक रेटींग आहे. या प्रणालीनुसार खाद्य पदार्थांना पांच पैकी गुण दिले जातात. बरेचदा इंटरनॅशनल ग्रुप रिसर्चमध्ये या प्रणालीचा वापर केला जातो. 

तसेच , अहवालामध्ये म्हटले आहे की, नेस्लेनेही हे मान्य केले आहे की, त्यांची काही उत्पादने ही कधीच आरोग्यास लाभदायक राहिली नाहीत. कंपनीने अनेक प्रयत्न करुन देखील ही उत्पादने आरोग्यास लाभदायक बनविण्यास यश प्राप्त झाले नाही. प्रसारमाध्यमांनी विचारले असता नेस्लेच्या अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यापूर्वी अधिकाऱ्यांनी  सांगितले की, कंपनीचा प्रयत्न आहे की, आमची उत्पादने आवश्यक न्यूट्रिशन पूर्ततेचा प्रयत्न करतील जी संतुलित आहार उपलब्ध करण्यास मदत करतील.

अजूनदेखील  हे स्पष्ट होऊ शकले नाही , हा अहवाल नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत काही भाष्य करतो का किंवा भारतातील नेस्ले उत्पादनही या अहवालातील उल्लेखाप्रमाणे अपायकारक ठरतात का. विशेष म्हणजे , हा अहवाल आल्यानंतर कंपनीने ई - कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपली उत्पादने  जास्तीत जास्त विकण्याकरिता ऑफर देणे सुरु केले आहे.

Edited By -- Puja Bonkile 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com