पालकमंत्री संदीपान भुमरेंनी ताफा थंबवून अपघातग्रस्त जखमींना केली मदत

Guardian Minister Sandipan Bhumare helped the injured peoples in accident 
Guardian Minister Sandipan Bhumare helped the injured peoples in accident 
Published On

यवतमाळ: नुकतेच काही दिवसांपूर्वी यवतमाळचे पालकमंत्री Guardian Minister म्हणून संदीपान भुमरे Sandipan Bhumare यांची नियुक्ती झाली होती. कोविड Covid परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल ते यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात आले होते. यवतमाळ येथे परत येत असतांना पांढरकवडा Pandharkavda ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक Accident दिली होती. Guardian Minister Sandipan Bhumare helped the injured peoples in accident 

वणी, पांढरकवडा, मारेगाव, रालेगाव येथील कोविड केअर सेंटरची पाहणी त्यांनी केली होती. यवतमाळ येथे परत येत असतांना पांढरकवडा Pandharkavda ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक Accident दिली होती. त्या ठिकाणी एका रिक्षामध्ये  दहा ते बारा व्यक्ती होते. त्यातील अनेक लोक जखमी Injured झाले होते आणि कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. तसेच त्यांच्यासाठी कोणी थांबत नसताना पालकमंत्री सांदिपान भूमरे यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला आणि जखमींना पाहून त्वरित पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले.

याप्रसंगी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हेही त्यांच्यासोबत होते. पालकमंत्री यांनी ज्या पद्धतीने संवेदनशीलता दाखविली आणि वेळेचे महत्व ओळखून तातडीने सर्व अपघातग्रस्ताना ताफ्यातले वाहने देऊन रुग्णालयात दाखल केले, त्यांच्या या मानवतावादी दृष्टीकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com