शेतकऱ्याने वीस गुंठयातून घेतले कारल्याचे भरघोस उत्पन्न; मात्र टाळेबंदी मुळे भावच नाही

karle
karle

मावळ- श्रीक्षेत्र देहुगावच्या Dehugaon एका शेतकऱ्याने Farmer वीस गुंठे शेतीत Farming कारल्याचे भरघोस उत्पन्न घेतले ,मात्र टाळेबंदीत Lockdown मालाला भाव नसल्याने शेतकरी Farmer हवालदिल झाला आहे. प्रगतिशील शेतकरी गणेश टिळेकर Ganesh tilekar यांनी वीस गुंट्ठेमध्ये सेंद्रिय पद्धतीने  कारल्याची लागवड केली आहे. या कारल्याचं भरघोस उत्पन्न निघालय,अवघ्या दोन महिन्यात एक लाख ते सव्वा लाखचं उत्पन्न मिळाल्याने सर्व कुटुंब Family आनंदित आहेत,गणेश टिळेकर हे आधुनिक पद्धतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत असतात गेल्या सहा वर्षापासून ते उन्हाळ्यात Summer कारल्याची शेती करतात. The farmer got a good income from cultivating 20 guntas

एकत्र कुटुंब असल्याने शेतीच्या कामात घरातील सर्व कुटुंब राबते त्यामुळे बाहेरचे मजूर लागत नसल्याने नफा ही चांगला होतो,परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना असल्याने सर्व भाजी मार्केट बंद आहेत.  

त्यामुळे घरातील संसाराचा गाडा हाकायला अडचणी येत आहेत. टिळेकर यांना रोपांसाठी सहा हजार रुपये खर्च आला तर मल्चिंग पेपर वर व बेडवर कारली लावली जात असल्याने त्यासाठी खुरपणीचा खर्च येत नाही मात्र मल्चिंग पेपर बेड तयार करणे ठिंबक चींचान याचा यात समावेश आहे. चार ट्रॉली शेणखत देऊन सेंद्रिय पद्धतीने पद्धतीने कारल्याचे पीक घेतात.  रोज दोनशे किलो कारल्याची उत्पन्न होतात.

हे देखील पहा -

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात कारल्याची दोन हजार रुपये खर्च करून नर्सरी मधून बी आणून लागवड केली. टिळेकर यांनी संपूर्ण कारल्याच्या रुपासाठी तार बांधून व लोखंडी अँगल च्या साह्याने मंडप घातला आहे कारल्याची प्रगती चांगली असून हिरवीगार रंग आहे त्यामुळे सध्या कारल्याला बाजार भाव पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो बाजार भाव मिळत आहे. टाळेबंदीत मार्केट बंद असल्यामुळे त्यांची करली शेतात पडून आहे. The farmer got a good income from cultivating 20 guntas

स्थानिक बाजारपेठेत विकला  जातो चाकण येथील बाजारपेठेत कारल्याला चांगला बाजारपेठ असते मात्र टाळेबंदी मुळे बंद आहे. आधी व्यापारी दोनशे किलो माल घेऊन जायचे मात्र अत्ता वीस किलो ही घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. आता शेतकरी आकाशाकडे बघून देवाचा धावा करतात अणि म्हणतात कधी टाळेबंदी उठवेल आणि आमच्या पिकाला भाव येईल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com