'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना कामावरून काढले

Nurses
Nurses
Published On

नंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department याआधीच 40 टक्के पदे रिक्त आहेत, कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत होती. Eighty two nurses have been dismissed after the outbreak of corona

त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची Workers भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात District कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच आरोग्य विभागाने 82 परिचारिकांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी Dismiss केले आहे.

यासंदर्भात या परिचारिकांनी जिल्हाधिकारी Collector  डॉ.राजेंद्र भारूड Rajendra Bharud यांना निवेदन देऊन कामावर परत घेण्याची मागणी केली आहे. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता मुंबई-पुणे येथील नोकरी सोडून परिचारिकांनी जिल्ह्यात कोवीड रुग्णांना सेवा देण्यासाठी प्राधान्य दिले.

हे देखील पहा -

परंतू आरोग्य विभागाने गरज संपताच कामावरून काढून टाकल्याने बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आणली आहे अशी भावना या परिचारिका व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमी आहे त्या ठिकाणी आम्हाला कामात सामावून घ्यावे अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला तर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी सदर परिचारिकांना पुढील काही काळापर्यंत कामावर परत घ्यावे अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या असल्याची माहिती दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com