कोरोनाने बापाचा मृत्यू, ग्रामस्थांसह सख्ख्या दोन मुलांचाही खांदा देण्यास नकार

corona death
corona death
Published On

रायगड - मृत्यू Death झाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ एकत्रित येऊन मृत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत Cemeteryअंत्यविधी करतात. त्यानंतर त्याचे उत्तर कार्य, दशकार्य केले जाते. मात्र, कोरोनामुळे Corona मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला ना नातेवाईक ना ग्रामस्थ फक्त रुग्णालयातील आरोग्य सेवक त्यांची अंत्यविधी करतात. शिवाय कोरोना रुग्णांचे नातेवाईकही मृत्यूनंतर त्याची अवहेलना करतात. अशीच काहीशी परिस्थिती म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथे पाहायला मिळाली. येथील गोविंद जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर गावातील लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत, त्यांच्या सख्या दोन मुलांनीही वडिलांचे दहन करण्यास नकार दिला. अखेर म्हसळा पोलीस, तहसील कर्मचारी, पत्रकार आणि रूग्णवाहिका चालकाने जाधव यांचा अंत्यसंस्कार  केला. due to corona 2 children refuse to do Funerals of their father

म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव (वय 76) हे कोरोनाग्रस्त झाले होते. गोविंद जाधव हे घरीच कोरोनावर उपचार घेत होते. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू पावल्यानंतर पुढचा अंत्यविधी करण्याबाबत नातेवाईक, गावातील ग्रामस्थांनी नकार दिला. जाधव यांच्या दोन सख्या मुलांनीही वडिलांच्या अंत्यविधीला नकार दिला.

पोलीस, पत्रकार, रूग्णवाहिका चालकाने अखेर माणुसकी दाखवत गोविंद जाधव यांच्या बाबत माहिती म्हसळा पोलिसांना कळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांनी पुढाकार घेऊन संतोष चव्हाण, सूर्यकांत यांना त्वरित घटनास्थळी पाठविले. त्याच्यासोबत म्हसळा तहसील कार्यालयाचे सर्कल दत्ता करचे, पत्रकार निलेश कोकचा आणि रूग्णवाहीका चालक शरद नांदगावकर, भरत चव्हाण हे सुद्धा आले. शरद नांदगावकर यांनी सर्वांना पीपीई किटची उपलब्धता करून दिली. त्यानंतर या सर्वांनी तिरडी बांधून जाधव यांची 2 किमी स्मशानभूमी पर्यंत खांद्यावर अंत्ययात्रा काढली आणि गोविंद जाधव यांना अग्नी दिला.  due to corona 2 children refuse to do Funerals of their father

कोरोनाने मृत पावलेल्या जाधव यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थांसह त्यांच्या स्वतःच्या मुलांनीही नकार दिला. असे असले तरी पोलीस, महसूल प्रशासन, पत्रकार, रूग्णवाहिका चालक यांनी माणुसकी दाखवून एक सत्कार्य केले. मात्र, अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com