बीड नगरपालिकेकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप

Beed
Beed
Published On

बीड - बीड Beed नगरपालिकेच्या Municipality वतीने शहरातील कोविड Covid योद्धा Warrior म्हणून काम करणाऱ्या, पालिका कर्मचाऱ्यांसह Workers मागास नागरिकांना Citizens, कोरोना Corona प्रतिबंधात्मक Preventive साहित्याचे Material वाटप करण्यात आले आहे. Distribution of Corona Preventive Materials By Beed Municipality

हे देखील पहा -

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड नगरपालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे.

मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दरम्यान हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नगरपालिका कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी, कर्मचारी आणि आर्थिक दृष्टया मागासलेल्या जवळपास 20 हजार नागरिकांना कोरोना फॅमिली किट,वाटप Distribution सुरू केले आहे.Distribution of Corona Preventive Materials By Beed Municipality

त्याचबरोबर 600 थर्मलगन, 600 ऑक्सिमिटर, 2 हजार 500 पीपीई किट, 2 हजार नॉन डीसपोझेबल किट, 4 हजार फॅमिली कोरोना किट यांचाही वाटप डॉ.क्षीरसागर यांनी सुरू केले आहे. दरम्यान बीड शहरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना नियम पाळावे तेव्हाच वाढणारे रुग्ण कमी होतील असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com