लोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी

Saam Banner Template
Saam Banner Template
Published On

लोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना आज पोलीस प्रशासनाकडून माघारी पाठविण्यात आले. पावसाळा सुरु होताच शनिवार व रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात (Lonavala) दाखल झाले आहेत. काल लोणावळा खंडाळा (Khandala) परिसरातील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली होती. आज मात्र लोणावळा शहर पोलिसांनी भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील नौसेना बाग याठिकाणी चेकपोस्ट नाका लावत विनाकारण नियमांचे उल्लंघन करत आलेल्या पर्यटकांना माघारी पाठवले. (Crowds of tourists violating government rules in Lonavla)

लोणावळ्यात आज पर्यटकांची काही हजार वाहने दाखल झाल्याने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास चार ते पाच किमी अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. तर भांगरवाडी रेल्वे गेट जवळीत वाहनांची रांग नांगरगाव व सुरैय्या बंगल्यापर्यत गेली होती. भांगरवाडी भागात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर देखील पर्यटक वाहनांमुळे गर्दी झाली होती.

हे देखील पाहा

कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) राज्यात कमी होऊ लागले असले तरी अद्याप शासनाचे निर्बंध कायम आहेत, असे असताना लाॅकडाऊन (Lockdown) उठण्याची वाट न पाहता दोन दिवसांपासून हजारो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा व खंडाळा परिसरात दाखल झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनामुक्त लोणावळा करण्यासाठी स्थानिक आजही नियमांचे पालन करत असताना पर्यटकांनी मात्र शहरात हैदोस घातला आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com