अमरावती विद्यापीठाच्या कोविड लॅबने पार केला तीन लाख चाचण्यांचा टप्पा

Covid Lab of Amravati University has passed the stage of three lakh tests
Covid Lab of Amravati University has passed the stage of three lakh tests
Published On

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती Amravati विद्यापीठाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेने ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोना महामारीच्या या कठीण काळात रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून महामारी आटोक्यात आणण्यासाठी आपले योगदान दिले आहे. Covid Lab of Amravati University has passed the stage of three lakh tests

कोरोना Corona संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात मे २०२० मध्ये अमरावती विद्यापीठात कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. आयसीएमआरच्या ICMR निर्देशानुसार सुरुवातीला केवळ २४ सॅम्पल तपासून या प्रयोगशाळेत काम सुरू झाले. मात्र ज्या प्रमाणात जिल्ह्यातील रुग्ण वाढत गेले त्याच प्रमाणे या प्रयोगशाळेत देखील जास्तीत जास्त सॅम्पल तपासले जावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. 

दर दिवशी २४ सॅम्पल तपासणाऱ्या या प्रयोगशाळेत आता तब्बल २५०० सॅम्पल दररोज तपासले जात आहेत.  प्रयोग शाळेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. नीरज धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर डेटा एन्ट्री ऑपरेटर असे मिळून जवळपास ४५ जणांची टिम इथं कार्यरत आहे. या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या या लॅबने हा महत्वाचा टप्पा पार केल्याचं डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितलं.

मागील एक ते सव्वा वर्षाच्या या काळात विद्यापीठाच्या या लॅबने अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे जलदगतीने निदान करून संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.आज या लॅबमध्ये दिवसाला सरासरी २५०० सॅम्पल तपासले जातात.

हे देखील पहा - 

जानेवारी महिन्यात या प्रयोगशाळेने १ लाख चाचण्यांचा टप्पा पार केला त्यानंतर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत २ लाख सॅम्पल या लॅबमध्ये तपासण्यात आले. तर आता १० जून रोजी या लॅबने आपला ३ लाखांचा टप्पा पार केला. हा टप्पा गाठण्यासाठी पालकमंत्री, जिल्हा प्रशासन तसेच विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहकार्याने आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा ३ लाखांचा टप्पा आम्ही पूर्ण करू शकल्याची प्रतिक्रिया डॉ.नीरज धनवटे यांनी दिली.

आजच्या घडीला कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र रुग्णसंख्या घटली म्हणजे कोरोना संपला अशी परिस्थिती सध्या तरी नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढली तर जलदगतीने तपासण्या करून रुग्णांचे निदान व्हावे यासाठी ही प्रयोगशाळा जिल्ह्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल यात शंका नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com