"तु मेरी जोहरा जबी.. म्हणत ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल 

At Covid Hospital the artists perform songs and the patients did dance on it
At Covid Hospital the artists perform songs and the patients did dance on it
Published On

पुणे - तु मेरी जोहरा जबी, और इस दिल में, चोरीचा मामला या हिट गाण्यांसोबत शिर्डी वाले साईबाबा अश्या भक्तीगीतांनी प्रेक्षक टाळ्या वाजवत दाद देत होते.  हा कार्यक्रम कुठे सार्वजनिक ठिकाणी चालू नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये Chhatrapati Shivaji Maharaj Covid Hospital कलाकारांनी गाणी सादर करून रुग्णांना त्यावर डोलायला लावले आहे. At Covid Hospital the artists perform songs and the patients did dance on it

छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचे संचालक उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी रंगला होता. यावर उमेश चव्हाण म्हणाले की, इतर आजाराशी लढताना कुटुंबीय,आप्तेष्ट, मुले - नातवंडे सोबत असतात. मात्र कोविड Corona रुग्णाला कोणालाही भेटता येत नसल्याने एकटेपणाची जाणीव होते. त्यामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या तपासण्या, सातत्याने रुग्णाला दिले जाणारे उपचार, यामुळे नैराश्य आल्यासारखे वाटते. 

हे देखील पहा -

यातून बाहेर पडण्यासाठी आयोजित केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम यशस्वी ठरला, गायक अमर पुणेकर म्हणाले की, अनेक विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले, मात्र इथे संगीत सेवा करताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून मनाला खूप समाधान वाटले. At Covid Hospital the artists perform songs and the patients did dance on it

ऑक्सिजन लावून पडून राहिलेला रूग्ण जेव्हा गीतांचे बोल ऐकून उठून बसला, आणि गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत ताल धरू लागला तेव्हा त्यांची 'इम्युनिटी पॉवर' खऱ्या अर्थाने वाढली असल्याचे जाणवले आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com