मुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी व्यतिरिक्त राज्यातील आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचाही सहभाग आहे. पण कॉंग्रेसच्या एका नव्या युक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेसच एकट्यानेच लढवेल, असे वक्तव्य महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. मोठी गोष्ट म्हणजे या घोषणेतून नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारमधील दुर्लक्षांबाबतही कॉंग्रेसने अनेकदा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनाक्रमामुळे महाविकस आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. (The Congress will fight the next assembly elections alone said Nana Patole)
- काय म्हणाले नाना पटोले
2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि केवळ कॉंग्रेसची विचारसरणीच देशाला वाचवू शकेल. दिल्लीतील हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यासाठी आपण तयार आहोत, असे नाना पटोले यानी म्हटले आहे. त्यामुळे आता पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. तर, कॉंग्रेस निवडणुकीत एकट्यानेच लढला तर आमच्या पक्षाला त्याचा अधिक फायदा होईल, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.
- राष्ट्रवादीचे प्रवक्त्याचे निवेद
दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानानंतर, महाविकास आघाडीचे तीनही पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस) सरकार चालवण्याच्या मुद्द्यावर एकजूट आहेत. तथापि, सध्या तरी 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.