सावधान...धरणात पोहाल तर तुरुंगात जाल

dhule
dhule

धुळे - गेल्या काही दिवसांपासून धरण Dam व तलावांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी धरण व तलावांमध्ये पोहणाऱ्यांवर swim थेट गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी Collector संजय जाधव Sanjay Jadhav यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले आहेत. Be careful if you swim in the dam you will go to jail

जलसंपदा विभागाने धरण व तलावाच्या परिसरात नागरिकांच्या माहितीसाठी सूचना फलक लावावे , असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव  Sanjay Yadav यांनी दिले आहेत .

हे देखील पहा -

सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असल्यामुळे धरण व तलाव परिसरामध्ये मोठ्या संख्येने तरुण हे पोहण्यासाठी तलावावर व धरणावर जात आहेत. व त्यामुळेच धरण व तलावांमध्ये खोलीचा अंदाज न आल्यामुळे बहुतांश तरुणांचा गेल्या काही दिवसांमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. Be careful if you swim in the dam you will go to jail

त्यामुळेच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती व कोविड व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली . या बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी संजय यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com