मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर गोटे यांनी साधला परिपत्रकातून निशाणा म्हणाले....

anil gote
anil gote

धुळे -  सुप्रीम कोर्टाने Supreme Court मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षण Maratha Reservation रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा मराठा समाजाच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आणि यावरून आता राजकीय वर्तुळामधून एक दुसऱ्यावर चिखलफेक करीत मराठा आरक्षण रोखण्यावरून एकमेकांवर आरोप Allegations देखील करण्यात येत आहेत. Anil Gote on Derevdra Fadnavis 

हे देखील पहा -

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याचा आरोप धुळे Dhule शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे Anil Gote यांनी एका परिपत्रकाद्वारे केला आहे.

गोटे यांनी एक परिपत्रक सोशल मीडिया वरती व्हायरल केले असून या पत्रकातून मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांवर अनिल गोटे यांनी तोफ डागली आहे. मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करणारे डॉ. अनुप मरार, देवेंद्र जैन, रुचिता कुलकर्णी व मधुश्री जेथलिया यांच्याशी फडणवीसांचे संबंध काय तसेच जातीवर आधारित आरक्षणाला संघाचा विरोध असताना फडणवीस मात्र आरक्षणा बाबतीत पाठिंबा दर्शवत संघाच्या विचारांच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करून गोटे यांनी फडणवीसांवर परिपत्रकाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com