10 मिनिटांच्या भेटीत शरद पवार राऊतांना काय म्हणाले?

10 मिनिटांच्या भेटीत शरद पवार राऊतांना काय म्हणाले?

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट केवळ 'सदिच्छा' भेट होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता पवार माध्यमांशी बोलणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता होती. राऊत अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही भेट आटोपून सिल्व्हर ओकच्या बाहेर आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांच्याशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांनी राज्यातल्या अस्थिर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. यावर पवार यांची भूमीका ठाम आहे."
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com