36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

Published On

मुंबई- राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू, पावसाचा मतमोजणीवर परिणाम, हवामान खात्यानं  उद्या मुसळधार पाऊस होण्याचा वर्तवला अंदाज 

धुळे- धुळ्यात देखील परतीच्या पावसाची हजेरी, नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा.सखल भागात घरामध्ये शिरलं पाणी 

धुळे - अक्कलपाडा  धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 7 हजार क्युसेक वेगाने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 
औरंगाबाद-
औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळं हिवरा नदीला पूर. व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ  पावसाचा शेती पिकालाही मोठा फटका.  

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गात मुसळधार परतीचा पाऊस,  कोकणातील भात शेतीचं मोठं नुकसान फोंडा, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला या भागांमध्ये जोरदार पाऊस , शेतकरी चिंताग्रस्त. 

रायगड- रायगडमध्ये जोरदार परतीचा पाऊस, भातपीक धोक्यात.विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या जोरदार सरी, परतीच्या पावसाने शेतकऱ्याची उडवली झोप.  

जालना - जालन्यात मुसळधार पाऊस,पावसामुळे सोंगणी केलेल्या मक्याची कणसं पावसाच्या पाण्यात गेली वाहून. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 

पुणे- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, नदीनाले तुडूंब भरून वाहतायत..  हिवरे कुंभार आणि  पिंपळे खालसा या गावांमध्ये पुलावरून पाणी वाहू लागलंय... पाऊस बरसल्याने शेतकरी समाधानी.  

वाशिम- हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड तालुक्यासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटींग, परतीचा पाऊस रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांसाठी पोषक. 

पालघर- पालघर जिल्ह्यात पूर्व ग्रामीण भागात परतीच्या पावसाची दमदार हजेरी, डहाणूतील कासा , विक्रमगड  , तलासरी या परिसरात दमदार पाऊस बरसला... मात्र या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत...

लातूर-  दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या लातूरकरांना परतीच्या पावसाने दिला दिलासा. मांजरा धरणाच्या पाणीपातळीत 4 दशलक्ष घनमीटरने वाढ, जिल्ह्यातील लहान- मोठे तलावही तुडुंब 

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यासह सीमावर्ती मध्यप्रदेश राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या 33 दरवाजांपैकी 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. त्यातून 1017 क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग. 

पुणे-  फलटण-दहिवडी रस्त्यावर एसटी बस एका पुलावर वाहत्या पाण्यामध्ये पडली बंद ... भाडळी बुद्रक गावच्या  ग्रामस्थांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं, मोठा अनर्थ टळला. 

सोलापूर -  सोलापुरात मुसळधार पावसामुळे धोकादायक झालेली जुनी इमारत कोसळली... इमारतीत कोणी राहात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. 

ठाणे - शहापूर विधानसभा मतदारसंघातील बोराळा ग्रामस्थांचा मतदान करण्यासाठी जीवघेणा प्रवास, गावातून रस्ता नसल्याने नागरिकांनी तानसा धरणातून तराफ्याहून केला प्रवास .. मतदान केल्यानंतर परत असताना तराफा उलटून ९५ नागरिकांचा जीव धोक्यात.. मच्छिमारांनी वाचवला जीव. 

वाशिम- वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही धुक्याची दाट चादर, धुक्यामुळं मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम. सतत पडत असलेल्या या धुक्यामुळं पिकांना फटका,शेतकरी चिंतेत. 

मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याच्या कामासाठी आज दुपारी १२ ते २  ब्लॉक, दोन तासांच्या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद.

मुंबई-  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलच्या दरात भरमसाठ वाढ, 21 ऑक्टोबर म्हणजेच मतदानाच्या दिवसापासून नवीन दर लागू. 

पुणे- पुणे-नगर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था, वाघोली आणि कोरेगाव भीमा इथल्या रस्त्यांवर मोठे खड्डे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक वाहनचालक खड्ड्यात पडला. 

कोल्हापूर- हुबळीतल्या स्फोटाच्या पार्सलवर एका आमदाराचं नाव असल्याचं समोर, भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर यांच्या नावानं हे पार्सल.पोलीसांची या प्रकऱणी चौकशी सुरू.

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगीत गावठी बॉम्ब बनवणाऱ्यांना अटक, याप्रकरणी विलास जाधव, आनंदा जाधव या संशयितांना अटक,शिकारीसाठी बॉम्ब बनवत असल्याची माहिती समोर.

मुंबई- राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू, पावसाचा मतमोजणीवर परिणाम, हवामान खात्यानं  उद्या मुसळधार पाऊस होण्याचा वर्तवला अंदाज 

धुळे- धुळ्यात देखील परतीच्या पावसाची हजेरी, नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा.सखल भागात घरामध्ये शिरलं पाणी 

धुळे - अक्कलपाडा  धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 7 हजार क्युसेक वेगाने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळं हिवरा नदीला पूर. व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ  पावसाचा शेती पिकालाही मोठा फटका.  

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गात मुसळधार परतीचा पाऊस,  कोकणातील भात शेतीचं मोठं नुकसान फोंडा, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला या भागांमध्ये जोरदार पाऊस , शेतकरी चिंताग्रस्त. 

रायगड- रायगडमध्ये जोरदार परतीचा पाऊस, भातपीक धोक्यात.विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या जोरदार सरी, परतीच्या पावसाने शेतकऱ्याची उडवली झोप.  

जालना - जालन्यात मुसळधार पाऊस,पावसामुळे सोंगणी केलेल्या मक्याची कणसं पावसाच्या पाण्यात गेली वाहून. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 

पुणे- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, नदीनाले तुडूंब भरून वाहतायत..  हिवरे कुंभार आणि  पिंपळे खालसा या गावांमध्ये पुलावरून पाणी वाहू लागलंय... पाऊस बरसल्याने शेतकरी समाधानी.  

वाशिम- हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड तालुक्यासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटींग, परतीचा पाऊस रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांसाठी पोषक. 

पालघर- पालघर जिल्ह्यात पूर्व ग्रामीण भागात परतीच्या पावसाची दमदार हजेरी, डहाणूतील कासा , विक्रमगड  , तलासरी या परिसरात दमदार पाऊस बरसला... मात्र या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत...

लातूर-  दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या लातूरकरांना परतीच्या पावसाने दिला दिलासा. मांजरा धरणाच्या पाणीपातळीत 4 दशलक्ष घनमीटरने वाढ, जिल्ह्यातील लहान- मोठे तलावही तुडुंब 

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यासह सीमावर्ती मध्यप्रदेश राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या 33 दरवाजांपैकी 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. त्यातून 1017 क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग. 

पुणे-  फलटण-दहिवडी रस्त्यावर एसटी बस एका पुलावर वाहत्या पाण्यामध्ये पडली बंद ... भाडळी बुद्रक गावच्या  ग्रामस्थांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं, मोठा अनर्थ टळला. रस्सीच्या साह्याने एसटी बस बाहेर काढली

सोलापूर -  सोलापुरात मुसळधार पावसामुळे धोकादायक झालेली जुनी इमारत कोसळली... इमारतीत कोणी राहात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. 

ठाणे - शहापूर विधानसभा मतदारसंघातील बोराळा ग्रामस्थांचा मतदान करण्यासाठी जीवघेणा प्रवास, गावातून रस्ता नसल्याने नागरिकांनी तानसा धरणातून तराफ्याहून केला प्रवास .. मतदान केल्यानंतर परत असताना तराफा उलटून ९५ नागरिकांचा जीव धोक्यात.. मच्छिमारांनी वाचवला जीव. 

वाशिम- वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही धुक्याची दाट चादर, धुक्यामुळं मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम. सतत पडत असलेल्या या धुक्यामुळं पिकांना फटका,शेतकरी चिंतेत. 

मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याच्या कामासाठी आज दुपारी १२ ते २  ब्लॉक, दोन तासांच्या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद.

मुंबई-  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलच्या दरात भरमसाठ वाढ, 21 ऑक्टोबर म्हणजेच मतदानाच्या दिवसापासून नवीन दर लागू. 

पुणे- पुणे-नगर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था, वाघोली आणि कोरेगाव भीमा इथल्या रस्त्यांवर मोठे खड्डे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक वाहनचालक खड्ड्यात पडला. 

कोल्हापूर- हुबळीतल्या स्फोटाच्या पार्सलवर एका आमदाराचं नाव असल्याचं समोर, भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर यांच्या नावानं हे पार्सल.पोलीसांची या प्रकऱणी चौकशी सुरू.

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगीत गावठी बॉम्ब बनवणाऱ्यांना अटक, याप्रकरणी विलास जाधव, आनंदा जाधव या संशयितांना अटक,शिकारीसाठी बॉम्ब बनवत असल्याची माहिती समोर.

मुंबई- चेंबुरमधून एका मुलीचं अपहरण,संतप्त जमावानं केला राडा. पोलिसांनाही धक्काबुक्की करत मारहाण, एकंदरीतच याठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण. 

नागपूर- नागपूरात पोलीस ठाण्यावरच पोलिसांचा छापा, नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून 34 ग्रॅम ड्रग्स आणि 2 लाख 45 हजार रुपये केले जप्त. 5 पोलिसांचं निलंबन 

बारामती- बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक माने यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून  काढली धींड. अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप 

मुंबई- शिवसेनेच्या 10 रूपयांच्या थाळीवरून विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार टिका केली, दुसरीकडे शिवसेनेनं महाराष्ट्राच्या आधी जम्मू-काश्मीरमध्ये योजना केली सुरू. शिवसेनेने गरजू लोकांना दहा रुपयांत 'साहेब खाना' सुरू केलाय..

मुंबई- शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीतून चक्क संजय राऊत यांच नाव वगळलं,संजय राऊतांची उचलबांगडी.    शिवसेनेकडून एकूण 18 नेत्यांची यादी जाहीर

पुणे - ईव्हीएमच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलीय,अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो, असा आरोप थोरातांनी केलाय.. 

सातारा-  घड्याळाला केलेलं मतदान कमळाला जात असल्याचा प्रकार साताऱ्यातल्या खटाव तालुक्यात घडला. आमदार शशिकांत शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर हे इव्हीएम मशीन बदललं.  

धुळे- धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी EVMमध्ये फेरफार होऊ नये यासाठी स्ट्राँग रुमबाहेर रात्रभर ठोकला तंबू. मतदान संपल्यानंतर EVM मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांपाठोपाठ गोटे स्ट्रॉग रुमपर्यंतही गेले. 

चंद्रपुर-  चंद्रपुरात मतदानाच्या दिवशी मतदारांना पैसे वाटत असल्याचा प्रकार उघड,पैसे देण्यापुर्वी मतदारांच्या बोटांवर शाई आहे की नाही हे देखील संबंधित व्यक्ती तपासताना दिसतेय..दरम्यान पैसे देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही....

नांदेड-  नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना खराब रस्त्याचा फटका,  रस्त्यात चिखल असल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून केला प्रवास. 

सिंधुदुर्ग- भाजप या विधानसभेत एकहाती सत्ता मिळवेल.. शिवसेनेची गरज लागणार नाही, असं बोलत राणेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. एक्झिट पोलपलीकडे भाजपला जागा मिळतील असं राणे म्हणालेत...

मुंबई- बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीला ठोकला रामराम,  या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा गौप्यस्फोट.  पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला...दरम्यान जनतेची साथ सोडणार नसल्याचंही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय..

जळगाव- जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सुरेश जैन यांना पुन्हा जेलमध्ये, प्रकृती खालावल्यामुळं  त्यांना नाशिक रुग्णालयात केलं दाखल. सुरेश जैन यांच्या छातीत दुखत असून, त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याची डॉक्टरांकडून माहिती.

मुंबई- मराठी चित्रपटांना थिएटर न देण्याच्या मुद्यावरुन मनसे आक्रमक.हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर खळखट्याक करु असा मनसेचा इशारा. हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा दिला इशारा. 

कोकण- देवगडच्या समुद्रात मच्छीमारांना व्हेल मासा सापडला.. जाळं कापून या व्हेल माशाची सुटका. व्हेल माशाची लांबी १६ ते १७ फूट इतकी, समुद्रात अलीकडे सातत्याने व्हेल माशाचा वावर. 

मुंबई- घाटकोपर-वर्सोवा मार्गावर सुरू झालेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रोने पाच वर्षांत ६० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. अवघ्या २६४ दिवसांत १० कोटी प्रवाशांची नोंद झाली आहे. जून २०१४ पासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली. तेव्हापासून मोठ्या संख्येने प्रवासी या सेवेचा वापर करताएत. 

मुंबई-चेंबुरमधून एका मुलीचं अपहरण,संतप्त जमावानं केला राडा. पोलिसांनाही धक्काबुक्की करत मारहाण, एकंदरीतच याठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण. 

नागपूर- नागपूरात पोलीस ठाण्यावरच पोलिसांचा छापा, नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून 34 ग्रॅम ड्रग्स आणि 2 लाख 45 हजार रुपये केले जप्त. 5 पोलिसांचं निलंबन 

बारामती- बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक माने यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून  काढली धींड. अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप 

मुंबई- शिवसेनेच्या 10 रूपयांच्या थाळीवरून विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार टिका केली, दुसरीकडे शिवसेनेनं महाराष्ट्राच्या आधी जम्मू-काश्मीरमध्ये योजना केली सुरू. शिवसेनेने गरजू लोकांना दहा रुपयांत 'साहेब खाना' सुरू केलाय..

मुंबई- शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीतून चक्क संजय राऊत यांच नाव वगळलं,संजय राऊतांची उचलबांगडी.    शिवसेनेकडून एकूण 18 नेत्यांची यादी जाहीर

पुणे - ईव्हीएमच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलीय,अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो, असा आरोप थोरातांनी केलाय.. 

सातारा-  घड्याळाला केलेलं मतदान कमळाला जात असल्याचा प्रकार साताऱ्यातल्या खटाव तालुक्यात घडला. आमदार शशिकांत शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर हे इव्हीएम मशीन बदललं.  

धुळे- धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी EVMमध्ये फेरफार होऊ नये यासाठी स्ट्राँग रुमबाहेर रात्रभर ठोकला तंबू. मतदान संपल्यानंतर EVM मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांपाठोपाठ गोटे स्ट्रॉग रुमपर्यंतही गेले. 

चंद्रपुर-  चंद्रपुरात मतदानाच्या दिवशी मतदारांना पैसे वाटत असल्याचा प्रकार उघड,पैसे देण्यापुर्वी मतदारांच्या बोटांवर शाई आहे की नाही हे देखील संबंधित व्यक्ती तपासताना दिसतेय..दरम्यान पैसे देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही....

नांदेड-  नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना खराब रस्त्याचा फटका,  रस्त्यात चिखल असल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून केला प्रवास. 

सिंधुदुर्ग- भाजप या विधानसभेत एकहाती सत्ता मिळवेल.. शिवसेनेची गरज लागणार नाही, असं बोलत राणेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. एक्झिट पोलपलीकडे भाजपला जागा मिळतील असं राणे म्हणालेत...

मुंबई- बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीला ठोकला रामराम,  या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा गौप्यस्फोट.  पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला...दरम्यान जनतेची साथ सोडणार नसल्याचंही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय..

जळगाव- जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सुरेश जैन यांना पुन्हा जेलमध्ये, प्रकृती खालावल्यामुळं  त्यांना नाशिक रुग्णालयात केलं दाखल. सुरेश जैन यांच्या छातीत दुखत असून, त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याची डॉक्टरांकडून माहिती.

मुंबई- मराठी चित्रपटांना थिएटर न देण्याच्या मुद्यावरुन मनसे आक्रमक.हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर खळखट्याक करु असा मनसेचा इशारा. हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा दिला इशारा. 

कोकण- देवगडच्या समुद्रात मच्छीमारांना व्हेल मासा सापडला.. जाळं कापून या व्हेल माशाची सुटका. व्हेल माशाची लांबी १६ ते १७ फूट इतकी, समुद्रात अलीकडे सातत्याने व्हेल माशाचा वावर. 

मुंबई- घाटकोपर-वर्सोवा मार्गावर सुरू झालेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रोने पाच वर्षांत ६० कोटी प्रवाशांचा टप्पा.  अवघ्या २६४ दिवसांत १० कोटी प्रवाशांची नोंद 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com