Sushant Singh Rajput 
web-special-news

सुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट!

विश्वभूषण लिमये

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या प्रथम स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी त्यानं संपादन केलेलं यश आणि त्याचा प्रवास अधोरेखित करणारी एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. www.ImmortalSushant.com अशी ही वेबसाईट आहे. Website Dedicated to Sushant Sinh Rajput Launched

सुशांतसाठी खास तयार करण्यात आलेल्या या वेबसाईटवर त्याच्या कलाविश्वातील प्रवासासोबतच इतर आवडीनिवडी, त्याचे प्रयत्न, विविध ट्रेंड्स याबाबत माहिती मिळणार आहे. सुशांतची छायाचित्र आणि त्याच्या काही मुलाखतीही या माध्यमातून चाहत्यांना पाहता येणार आहेत. हे वेबसाईट निर्मितीसाठी सुशांतच्या कुटुंबीयांनीही समर्थन दिलं आहे. 

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठे वादळ उठवले. अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. Website Dedicated to Sushant Sinh Rajput Launched

हे देखिल पहा

आज वर्ष झाले तर सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युचं कोडं उलगडलेलं नाही. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. हा तपास सीबीआयकडं जाऊनही सुशांतच्या मृत्युच्या कारणावर प्रकाश पडलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT