Golden City Found in Egypt 
web-special-news

तीन हजार वर्षांपूर्वीची सुवर्णनगरी सापडली; इजिप्तमधील संशोधन

वृत्तसंस्था

कैरो : इजिप्तमध्ये Egypt दक्षिणेकडील लक्सर शहरामध्येच तीन हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सुवर्णनगरीचे अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी संशोधकांनी राजा तुतानखामेन याच्या मुलाची कबर शोधून काढली होती, त्यापाठोपाठचे हे सर्वांत मोठे संशोधन मानले जात आहे. राष्ट्रीय पुरातत्त्व खात्याने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिली आहे. Three Thousand Years old Golden City Found in Egypt

संशोधकांना उत्खननामध्ये सापडलेल्या नगराचे नाव हे ॲटेन Aten असे असून Egypt इजिप्तचा राजा अमेनहोतेप (तृतीय) याने हे शहर वसविल्याचे बोलले जाते. इजिप्तच्या प्राचीन राजघराण्यातील तो नववा राजा होता. या राजघराण्याने इसवीसनपूर्व १३९१ ते १३५३ या काळात इजिप्तवर राज्य केले होते. विशेष म्हणजे याच काळात इजिप्तमध्ये प्रशासकीय व्यवस्थेचा मोठा दबदबा निर्माण झाला होता तसेच औद्योगिकीकरणाला देखील चालना मिळाली होती. सध्याच्या लक्सर शहराच्या पश्‍चिम दिशेला या शहराचे अवशेष आढळून आले आहेत.

सर्वांत मोठे संशोधन
जॉन हापकिन्स विद्यापीठामध्ये काम करणारे इजिप्तॉलॉजीचे Egyptology संशोधक बेट्सी ब्रायन म्हणाले की तुतानखामेनच्या कबरीनंतर हे देशातील सर्वांत मोठे संशोधन आहे. यामुळे अतिप्राचीन इजिप्तमधील लोकजीवन समजून घेण्यास मदत होईल. या प्राचीन शहराच्या अवशेषांमुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनाचा जागतिक संसर्ग आणि दहशतवाद्यांच्या कारवाया यामुळे या भागामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली होती. याचा फटका पर्यटनालाही बसला आहे.Three Thousand Years old Golden City Found in Egypt

याआधीही शोध
या संशोधनाची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर इजिप्तॉलॉजी हा ट्रेंड विशेष चर्चेत आला होता. अनेकांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. यामुळे इजिप्तचा खरा इतिहास समजण्यासाठी आणखी मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान अन्य देशांमधील असंख्य संशोधकांनी याआधीही या शहराचा शोध घेतला होता पण त्यांना ते शोधता आले नव्हते.
Edited By - Amit Golwalkar
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT