Congress not to participate in TV Debate today
Congress not to participate in TV Debate today 
web-special-news

..म्हणून काँग्रेस प्रवक्ते आज टिव्ही डिबेटला जाणार नाहीत!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे Elections तसेच काही लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, या निमित्ताने विविध वृत्तवाहिन्यांवरून News Channels प्रसारित होणाऱ्या निवडणूक विश्लेषण कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय काँग्रेसने Indian National Congress घेतला आहे. आम्हाला निवडणुकांपेक्षा लोकांच्या जीवाची जास्त काळजी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. Congress Not to participate in Todays Elecetion TV Debates

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. लोक रेमडिसिवीर, आॅक्सिजन यासाठी वणवण फिरत आहेत. काल २४ तासात देशात ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातला कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला निवडणूक विश्लेषणांमध्ये रस नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. Congress Not to participate in Todays Elecetion TV Debates

आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, पण ज्यावेळी देशातले लोक औषधे, आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससाठी वणवण हिंडत आहेत, त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर राहून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य मानतो. आज देश अभूतपूर्व संकटातून जात आहे. या संकटाला तोंड देण्यात मोदी सरकार कमी पडले आहे. अशावेळी मोदी सरकारला जबाबदारीचे भान आणून देण्याऐवजी निवडणुकांचा निकालांवर भाष्य करणे आम्हाला बरोबर वाटत नाही, असेही सुरजेवाला यांनी नमूद केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT